शहरं
Join us  
Trending Stories
1
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
2
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
3
“सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा”: अजित पवार
4
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
5
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
6
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
7
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
8
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
9
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
10
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
11
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
12
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
13
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
14
Maharashtra Day 2025 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्या 'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून, शेअर करा सुंदर शुभेच्छापत्रं!
15
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
16
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
17
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
18
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
19
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)

सर्व आमदारांचे निलंबन झाले तरी माघार नाही

By admin | Updated: April 3, 2017 05:24 IST

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मागणी विरोधकांनी विधिमंडळात लावून धरली आहे

उस्मानाबाद : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मागणी विरोधकांनी विधिमंडळात लावून धरली आहे. पण सत्तेची मस्ती चढलेले भाजपा सरकार आमदारांचे निलंबन करून विरोधकांचा आवाज दाबत आहे. मात्र कर्जमाफीसाठी विरोधी पक्षाच्या सर्व आमदारांचे निलंबन झाले तरी चालेल; पण आता माघार घेतली जाणार नाही, असा इशारा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला.शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी चंद्रपूर येथून सुरू झालेली संघर्ष यात्रा रविवारी जिल्ह्यात दाखल झाली. या निमित्ताने आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. मंचावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील आणि धनंजय मुंडे तसेच समाजवादी पार्टीचे अबू आझमी, आ. जितेंद्र आव्हाड, राणाजगजितसिंह पाटील, दिलीप सोपल, पतंगराव कदम, विद्या चव्हाण, भारत भालके, राहुल मोटे, विक्रम काळे, शेकापचे भाई धनंजय पाटील, जि.प. अध्यक्ष नेताजी पाटील यांच्यासह विरोधी पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.पवार म्हणाले की, ही संघर्ष यात्रा पद अथवा सत्ता मिळविण्यासाठी नाही. सत्तेवर विराजमान असलेल्या सरकारने शेती आणि शेतकऱ्यांची काळजी घ्यावी यासाठी आहे. ‘अच्छे दिन आनेवाले है’ असे म्हणत भाजपा सत्तेवर विराजमान झाली. प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट भाव देऊ, अशी ग्वाही दिली होती. परंतु, काँग्रेसप्रणित आघाडी सरकारने दिलेल्या दराच्या ५० टक्केही भाव अडीच वर्षांत हे सरकार देऊ शकलेले नाही.केंद्र तसेच राज्यातील भाजपा सरकारकडून धनदांडग्यांसह उद्योगपतींना पायघड्या टाकून वाट्टेल ती मदत करताना या सरकारला तिजोरीतील खडखडाची चिंता वाटत नाही. मात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायची म्हटले की, तिजोरीतील खडखडाटाचा मुद्दा पुढे येतो. कुठल्याही परिस्थितीत कर्जमाफी झाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, असा इशाराही पवार यांनी दिला. (प्रतिनिधी)>कर्जमाफी मिळेपर्यंत आमचा संघर्षऔसा/उजनी (जि. लातूर) : शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी होईपर्यंत सरकारच्या विरोधातील आमचा हा संघर्ष सुरूच राहणार आहे. कर्जमाफी होईपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही, असे प्रतिपादन खा. अशोक चव्हाण यांनी रविवारी येथे केले. बुधोडा, औसा मोड, बोरफळ, बेलकुुंड मार्गे ही संघर्ष यात्रा उजनी येथे पोहोचल्यानंतर तिथे झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते.