शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
3
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
4
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
5
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
6
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
7
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
8
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
9
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
10
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
11
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
12
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
13
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
14
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
15
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
16
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
17
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
18
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
19
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
20
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...

तुळापूरच्या विकासासाठी सर्वतोपरी मदत

By admin | Updated: May 18, 2016 01:26 IST

श्रीक्षेत्र तुळापूर माझ्या मतदारसंघातील महत्त्वाचे गाव असल्याने या गावाची विविध विकासकामे झपाट्याने झाली पाहिजेत.

लोणीकंद : छत्रपती संभाजीमहाराजांची बलिदान भूमी, त्रिवेणी संगम असलेले श्रीक्षेत्र तुळापूर माझ्या मतदारसंघातील महत्त्वाचे गाव असल्याने या गावाची विविध विकासकामे झपाट्याने झाली पाहिजेत. त्यासाठी निधी कमी पडू देणाार नाही, असे आश्वासन शिरूर-हवेलीचे आमदार बाबूराव पाचर्णे यांनी दिले. तुळापूर (ता. हवेली) येथे सुमारे ८३ लाख रुपये खर्चाच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटन आमदार पाचर्णे यांच्या हस्ते झाले. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रदीप कंद अध्यक्षस्थानी होते. जिल्हा नियोजन समितीचे सदस्य दादासाहेब सातव, भाजपा तालुकाध्यक्ष गणेश कुटे, शिरूर तालुकाध्यक्ष भगवान शेळके, ज्ञानेश्वर वाळके, बाळासाहेब चव्हाण, रवींद्र कंद, सुभाष जगताप, अप्पासाहेब बेनके, बाबासाहेब दरेकर, माजी सरपंच ज्ञानेश्वर शिवले, गणेश पुजारी, राहुल राऊत आणि सरपंच रूपेश शिवले आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. पाचर्णे म्हणाले, ‘‘रस्ता कॉक्रिटीकरण, शालेय वर्गखोल्या बांधकाम, पाणीपुरवठा योजना, भूमिगत गटारे, सभागृह आदी कामे आपण आज करीत आहोत. ही कामे दर्जेदार व उत्कृष्ट होतील, याकडे गावाच्या नेतृत्वाने लक्ष द्यावे तसेच गावासाठी व परिसरासाठी लोकहिताचा विचार करून विविध कामांना प्राधान्य देण्यात येईल.’’कंद म्हणाले, ‘‘तुळापूरचे नेतृत्व युवा पिढीकडे आल्याने गावाच्या विकासकामांना अधिक वेग येणार असून, स्वत:चे गाव समजून या गावाच्या विकासासाठी अधिक लक्ष देईन.’’ उपसरपंच अमोल शिवले यांनी स्वागत केले. सरपंच रूपेश शिवले यांनी प्रास्ताविक केले. संतोष शिवले यांनी सूत्रसंचालन केले.