शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

दिवसभर राबायचे अन् रात्री पाण्यासाठी जागायचे !

By admin | Updated: April 18, 2016 02:56 IST

दिवसभर पोटासाठी राबराब राबायचे अन् रात्री हंडाभर पाण्यासाठी जागायचे, असा नित्यनियम आष्टी तालुक्यातील जोमदार तांडा येथे दोन महिन्यांपासून सुरू आहे. गावात एकही हातपंप सुरू

- व्यंकटेश वैष्णव,  बीडदिवसभर पोटासाठी राबराब राबायचे अन् रात्री हंडाभर पाण्यासाठी जागायचे, असा नित्यनियम आष्टी तालुक्यातील जोमदार तांडा येथे दोन महिन्यांपासून सुरू आहे. गावात एकही हातपंप सुरू नसल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.आष्टी शहरापासून तब्बल ६५ किलोमीटरवरील जोमदार तांडा येथील लोकसंख्या ५००च्या घरात आहे. मजुरी वगळता येथे कुठलेच उदरनिर्वाहाचे साधन नाही. दिवस उगवताच हातात खोरे-टिकाव घेऊन लोक दीड-दोन किलोमीटरवरील रोहयो अथवा इतर मिळेल त्या ठिकाणी कामावर जातात. सायंकाळी घरी आल्यावर जेवण होते न होते, तोच वेध लागतात पिण्याचे पाणी भरण्याचे. कधी टँकर येतो, तर कधी नाही. या तांड्यावर दोन-तीन दिवसांतून एक टँकर येते आणि तोसुद्धा रात्रीच्या वेळी. वेळ ठरलेली नसल्याने, रात्रभर टँकरची वाट पाहावी लागते.‘सतत विद्युतपुरवठा खंडित असल्यामुळे दिवसा टँकर भरले जात नाहीत. सायंकाळी वीजपुरवठा सुरू झाल्यानंतर १२ हजार लीटरचे टँकर भरण्याचे काम सुरू होते. ३० ते ४५ किलोमीटरवरून पाणी आणले जात असल्याने, आजूबाजूच्या गावांमध्ये रात्री १ नंतरच टँकर येतो. टँकरचा हॉर्न वाजताच गावातील लहान-थोरांचा त्याला गराडा पडतो,’ अशी व्यथा तुकाराम राठोड यांनी मांडली.दिवसभर काबाडकष्ट करून दमलेल्या लोकांना रात्री-अपरात्री पाणी भरण्यासाठी उठावे लागते. घरातील मुलांना टँकरवर पाइप टाकण्याचे काम असते. टँकर ज्या रस्त्याने येतो, त्या रस्त्यावरच लोक ठिय्या मारून बसतात. बीड जिल्ह्यात ८१० टँकरने पाणी पुरविले जात आहे. त्यात आष्टी तालुक्यात १३३ टँकरद्वारे ११९ वाड्या व ९१ गावांना पाणीपुरवठा केला जात असल्याचे तहसीलदार रामेश्वर गोरे यांनी सांगितले.गावात एकही हातपंप सुरू नाही. दोन दिवसांनी टँकर येतो, तोसुद्धा रात्री. पिण्याचे पाणी भरण्यासाठी सर्व गावच रात्रभर जागे असते. असे जोमदार तांड्याचे किसनराव राठोड यांनी मराठवाड्यातीस कष्टकरी जनतेच्या व्यथा मांडल्या.