शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

वासनाकांड प्रकरणातील सर्व आरोपी पुराव्याअभावी निर्दाेष

By admin | Updated: November 12, 2014 23:29 IST

दहा साक्षीदार फितूर : ‘पिटा’अंतर्गत योग्य तपास न झाल्याने पुरावे मिळाले नसल्याचे स्पष्टीकरण

रत्नागिरी : चौदा वर्षीय मुलीवर अनेकांनी बलात्कार केल्याचा व कुंटणखाना चालविण्यात आल्याचा आरोप ठेवून दाखल केलेल्या येथील वासनाकांड खटल्यात साक्ष व युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर आज, बुधवारी रत्नागिरी येथील न्यायालयाने सर्व सात आरोपींची सबळ पुराव्याअभावी निर्दाेष मुक्तता केली. या प्रकरणी २१ पैकी दहा साक्षीदार फितूर झाल्याने, तसेच या खटल्यात ‘पिटा’अंतर्गत योग्य तपास न झाल्याने पुरावे मिळू शकले नाहीत, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.सत्र न्यायाधीश एन. पी. कापुरे यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी जलदगतीने झाली. यात सातजणांवर दोषारोप ठेवण्यात आले होते. गेले काही दिवस या खटल्याची सुनावणी सुरू होती. सोमवार, तसेच मंगळवारी रात्रीपर्यंत सुनावणी सुरू होती. आज सायंकाळी उशिरापर्यंत न्यायालयात अंतिम सुनावणी झाली. आरोपींतर्फे अ‍ॅड. केतन श्रीराम घाग, अ‍ॅड.प्रदीप नेने, अ‍ॅड. महेंद्र मांडवकर, अ‍ॅड. संकेत घाग, अ‍ॅड. अविनाश शेट्ये, अ‍ॅड. शमीम पडवेकर, अ‍ॅड. शिवराज जाधव, अ‍ॅड. प्रकाश सुर्वे व अ‍ॅड. रत्नदीप चाचले यांनी यांच्यासह ९ वकिलांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)माहिती अहवालात तफावत पीडित मुलगी व प्रथम माहिती अहवाल यात तफावत असल्याचा युक्तिवाद स्वाती ठाकूर यांच्या वकिलांनी केला होता, तर अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्यास तिला अनेक दिवस वैद्यकीय उपचार घ्यावे लागतात. परंतु, तसे उपचार घेतल्याचे सरकारी पक्षाने कोठेही सांगितलेले नाही, असा युक्तिवाद अ‍ॅड. केतन घाग यांनी केला होता. या युक्तिवादानंतर न्यायालयाने हा निकाल दिला. निर्दोेष सुटलेल्यांमध्ये स्वाती किशोर ठाकूर, सुशील शांताराम मांडवकर, जितेंद्र ऊर्फ जितू अनंत शेट्ये, प्रकाश ऊर्फ बाळू सदानंद साळवी, मदन यशवंत जोशी, राजाराम गोपीनाथ सावंत, हरेश रतिलाल छाभैया यांचा समावेश आहे.