शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
6
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
7
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
8
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
9
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
10
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
11
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
12
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
13
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
14
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
17
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
18
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
19
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
Daily Top 2Weekly Top 5

अकलूज मुक्कामात बदल?

By admin | Updated: June 5, 2017 00:36 IST

अकलूजच्या श्री विठ्ठल मंदिराऐवजी सदाशिवराव माने विद्यालयाच्या प्रांगणामध्ये हलविण्यात येणार असल्याची माहिती पालखी सोहळाप्रमुख अभिजीत मोरे यांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कदेहूगाव : धर्मादाय आयुक्तांच्या सूचनेनुसार पालखी मुक्कामाला जागा कमी पडत असल्याने श्री संत तुकाराममहाराज पालखीचा मुक्काम अकलूजच्या श्री विठ्ठल मंदिराऐवजी सदाशिवराव माने विद्यालयाच्या प्रांगणामध्ये हलविण्यात येणार असल्याची माहिती पालखी सोहळाप्रमुख अभिजीत मोरे यांनी दिली.आषाढी वारीच्या वाटेवरील पालखीचा मुक्काम यंदा प्रथमच माने विद्यालयात होणार हे जवळ जवळ निश्चित झाले आहे. मात्र, अकलूजचे सरपंच शिवतेजसिंह मोहिते पाटील यांनी या बदलाला ग्रामस्थांचा विरोध असून, तसा ग्रामसभेचा ठरावही प्रशासनाला दिला असल्याचे सांगितले आहे. मात्र, प्रशासनाच्या सूचनेनुसार व सोहळाप्रमुख व विश्वस्त असा निर्णय घेत असेल तर त्यांनी ग्रामस्थांचे म्हणणे तरी ऐकून घ्यावे, असे त्यांनी सांगितले.सोहळा सुरू झाल्यापासून अकलूजचा मुक्काम येथील श्री विठ्ठल मंदिरात आहे. पूर्वी अकलूजची लोकसंख्या कमी होती. सध्या लोकसंख्या वाढली असून पालखीसाठी रस्ताही कमी पडत आहे. मांढरदेवी यात्रेत झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी धर्मादाय आयुक्तांनी २१ सूचनांसह दोन पानी सूचनापत्र दिले आहे. यानुसार अंमलबजावणी होत आहे. पालखी तळाबाबत काळानुरूप निर्णय घ्यावे लागणार असल्याचे अभिजित मोरे यांनी सांगितले. याची सुरुवात अकलूजपासून करणार असून या बदलामागे लोकभावनांचा अनादर करणे नसून सुरक्षितता आहे. रिंगण आणि मुक्काम एकाच ठिकाणीसंस्थानच्या या निर्णयाने या वर्षी प्रथमच अकलूज येथे रिंगण व मुक्काम एकाच ठिकाणी होणार असल्याचे जवळजवळ निश्चित असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, याबाबत माने विद्यालयात मुक्काम व अकलूज येथील स्टेडिअममध्ये रिंगण करण्याचा संस्थानचा प्रस्ताव होता. मात्र, स्टेडिअमची काही कामे अपूर्ण असल्याने हे रिंगण उपलब्ध जागेवर होणार असल्याचे मोरे यांनी सांगितले. याबाबत अकलूजचे सरपंच शिवतेजसिंह मोहिते पाटील म्हणाले की, या बदलाला ग्रामस्थांचा विरोध असून तसा ग्रामसभेचा ठरावही झाला आहे. तो प्रांतना दिला आहे.