शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

औंढ्यात मंदिर सुरक्षिततेसाठी अलर्ट

By admin | Updated: September 8, 2016 22:46 IST

देशातील १२ ज्योतिर्लिंपैकी आठवे ज्योतिर्लिंग असलेले श्री नागनाथ मंदिर उडवून देणारे निनावी पत्र परभणी पोलिसांना मिळाले

ऑनलाइन लोकमत,औंढा नागनाथ, दि. 8 - देशातील १२ ज्योतिर्लिंपैकी आठवे ज्योतिर्लिंग असलेले श्री नागनाथ मंदिर उडवून देणारे निनावी पत्र परभणी पोलिसांना मिळाले असून हिंगोली पोलिस विभागाने त्वरित मंदिराभोवती सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे.हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ हे ज्योतिर्लिंगाचे ठिकाण आहे. येथे भाविकांची नेहमीच गर्दी असते. सध्या गणेशोत्सव सुरू असल्याने परभणी पोलिस अधीक्षकांना हे मंदिर उडवून देणारे निनावी पत्रक प्राप्त झाले आहे. त्यानुषंगाने हिंगोली पोलिस अधीक्षक अशोक मोराळे यांनी संपूर्ण सुरक्षा यंत्रणा कामाला लावली असून मंदिराची सुरक्षा वाढविण्याचा सूचना संबंधीत अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. मंदिराच्या आत व परिसरात ठिकठिकाणी पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे. सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी अतिरिक्त पोलिस अधीक्षक सचिन गुंजाळ, पोलिस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे, फौजदार गिरीधारी कांबळे येथे आले आहेत. मंदिराच्या चार दरवाजांपैकी एकच प्रवेशद्वार सुरू ठेवण्याच्या सूचना पोलिस प्रशासनाने मंदिर संस्थानला दिल्या आहेत. तसेच मंदिरामध्ये नारळ व बॅग नेण्यास, नारळ फोडण्यास संस्थाननेही तात्काळ बंदी घेतली असून व्यवसायिकांनीही नारळ विक्री करू नये, अशा सूचना पोलिस व मंदिर प्रशासनाचा वतीने सचिव गजानन वाखरकर यांनी दिल्या आहेत. मंदिराच्या संपूर्ण भागाची तपासणी बॉम्बशोधक व नाशक पथकाचे सुनील नायक, तसेच एटीएसच्या पथकाने केली आहे. सतर्कता बाळगण्याचा सूचना पोलिस अधीक्षक अशोक मोराळे यांनी दिल्या आहेत.अफवांवर विश्वास ठेवू नका- पोलीस अधीक्षक मंदिराबाबत निनावी पत्राद्वारे धमकी दिली असून ते पत्र कसे व कोठून आले याचा तपास गोपनीय शाखेकडून सुरू करण्यात आला आहे. मंदिराच्या सुरक्षेसंदर्भात पोलिसांना सूचना देवून बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. नागरिक व भाविकांनी अशा अफवांना बळी पडू नये, परंतु संशयित व्यक्ती आढळल्यास पोलिसांना सूचना करण्याचे आवाहन पोलिस अधीक्षक अशोक मोराळे यांनी केली आहे.