शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

मद्यपार्ट्यांचे पेव

By admin | Updated: January 5, 2016 02:51 IST

राज्यातील मुंबई शहर, उपनगर, ठाणे, नाशिक आणि नागपूर या पाच प्रमुख शहरांत मद्यपार्ट्यांचे पेव फुटल्याचे निदर्शनास आले आहे. डिसेंबर २०१५मध्ये पाच शहरांत मद्याचा समावेश असलेल्या

चेतन ननावरे , मुंबईराज्यातील मुंबई शहर, उपनगर, ठाणे, नाशिक आणि नागपूर या पाच प्रमुख शहरांत मद्यपार्ट्यांचे पेव फुटल्याचे निदर्शनास आले आहे. डिसेंबर २०१५मध्ये पाच शहरांत मद्याचा समावेश असलेल्या २ हजार ९०४ पार्ट्या झाल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाकडून मिळाली आहे. त्यामुळे राज्याच्या नशाबंदी महामंडळापुढे मोठे आव्हान निर्माण झाले आहे.पाच महानगरांमध्ये मद्याच्या सर्वाधिक पार्ट्या मुंबईच्या उपनगरांत झाल्याचे समजते. पूर्व आणि पश्चिम उपनगरांत डिसेंबर महिन्यात पाच महानगरांच्या तुलनेत ५० टक्क्यांहून अधिक पार्ट्या झाल्या. मुंबई शहर आणि उपनगरांतील पार्ट्यांची आकडेवारी एकत्र केल्यास ही टक्केवारी ८० टक्क्यांहून अधिक आहे. त्यामुळे नशाबंदी मंडळाला मुंबईत अधिक जोमाने प्रबोधन करावे लागणार आहे. मुंबई उपनगरांत १ हजार ७०१ पार्ट्यांची नोंद झाली असून, शहरातही मद्याचा समावेश असलेल्या ७५३ पार्ट्या झाल्या. म्हणजेच एकट्या मुंबापुरीत २ हजार ४५४ पार्ट्या झाल्या आहेत. त्यापाठोपाठ ठाण्यात ३२३, नागपूरमध्ये ६६ आणि नाशिकमध्ये ६१ ठिकाणी ओल्या पार्ट्यांची परवानगी घेतली होती. याशिवाय या पाचही महानगरांत विनापरवानगी अनेक पार्ट्या झाल्या.सरकारने थर्टीफर्स्टला रात्रभर बार सुरू ठेवायची परवानगी देऊन दारूला एक प्रकारे प्रतिष्ठाच दिली आहे. त्यामुळे व्यसन न करणाऱ्या प्रतिष्ठित व्यक्तींनी नशाबंदी विरोधातील प्रबोधन चळवळीत उतरायला हवे. त्याशिवाय दारूचे विदारक सत्य समोर येणार नाही. ‘थर्टीफर्स्ट म्हणजेच दारू-फर्स्ट’ ही व्याख्या बदलत नाही, तोपर्यंत दारूचे प्रमाण घटणार नाही, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र राज्य नशाबंदी मंडळाच्या सरचिटणीस वर्षा विद्या विलास यांनी दिली.