शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

बारबाहेर आता ‘अल्कोबूथ’!

By admin | Updated: January 13, 2016 02:51 IST

दारू पिऊन वाहन चालवल्यामुळे होणाऱ्या अपघातांना आळा घालण्यासाठी मुंबई वाहतूक पोलिसांकडून एक नामी शक्कल लढवण्यात आली आहे. बारमध्ये मद्यपान केलेल्या ग्राहकाच्या शरीरातील

मुंबई : दारू पिऊन वाहन चालवल्यामुळे होणाऱ्या अपघातांना आळा घालण्यासाठी मुंबई वाहतूक पोलिसांकडून एक नामी शक्कल लढवण्यात आली आहे. बारमध्ये मद्यपान केलेल्या ग्राहकाच्या शरीरातील दारूचे प्रमाण तपासणारी ‘अल्कोबूथ’ मशिन मुंबईतील बार आणि रेस्टॉरन्ट्सबाहेर बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे त्या ग्राहकाला वाहन चालविण्यापासून रोखता येईल, अशी माहिती वाहतूक पोलिसांकडून देण्यात आली. या मशिनचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या हस्ते मुंबईतील एनसीपीए येथे रस्ता सुरक्षा सप्ताह कार्यक्रमप्रसंगी करण्यात आले.तळीराम चालक आढळल्यास वाहतूक पोलिसांकडून दोन हजार रुपये डिपॉझिट घेतले जाते. तसेच याबाबत न्यायालयातही केस चालवून दंड आकारणी, लायसन्स जप्ती किंवा शिक्षा ठोठावली जाते. तरीही चालक दुर्लक्षच करतात. २0१५ मध्ये दारू पिऊन वाहन चालवणाऱ्या तब्बल १८ हजार ३५ जणांवर कारवाई करण्यात आली. यात २१ ते २५ वयोगटातील ४ हजार ५१७ तर २६ ते ३0 वयोगटातील ५ हजार ४ तरुणांचा तर १८ ते २0 वयोगटातीलही ४८६ जणांचा समावेश आहे.हे प्रकार रोखण्यासाठी बार अ‍ॅन्ड रेस्टॉरन्टबाहेर पडणाऱ्या ग्राहकाला वाहन चालवण्यापासून रोखण्यासाठी अल्कोबूथ नावाची मशिनच बार अ‍ॅन्ड रेस्टॉरन्टबाहेर बसविण्यात येणार आहे. एखाद्या ग्राहकाच्या शरीरात दारूचे प्रमाण जास्त असल्यास ही मशिन त्या प्रमाणाची माहिती देईल. ग्राहकाची बार अ‍ॅन्ड रेस्टॉरन्टच्या मालक-चालक किंवा कर्मचाऱ्यांकडूनच मशिनद्वारे तपासणी केली जाईल. मद्याचे प्रमाण जास्त असल्यास त्याला चालक किंवा टॅक्सी सेवा उपलब्ध करून देण्याची जबाबदारीही त्या बार अ‍ॅन्ड रेस्टॉरन्ट चालकांची असेल, असे वाहतूक सह पोलीस आयुक्त मिलिंद भारांबे यांनी सांगितले.