आळंदी : धन्य आज दिन संतदर्शनाचा ।
अनंतजन्मीचा शीण गेला ।।
मज वाटे त्यांशी आलिंगन द्यावे ।
कदा न सोडावे चरण त्यांचे ।।
ज्ञानियांचा राजा संतश्रेष्ठ जगद्गुरू श्री ज्ञानोबारायांच्या 718व्या संजीवन समाधी दिन सोहळ्याचा छबिना व ‘श्रीं’ची पालखीतून नगरप्रदक्षिणा मिरवणूक काढून मोठय़ा उत्साहात सांगता करण्यात आली. ‘ज्ञानोबा माऊली-तुकाराम’चा जयघोष करीत हजारो माऊलीभक्त या मंदिर व नगरप्रदक्षिणा मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते. त्यानंतर भाविकांच्या गदीर्ने गजबजलेली अलंकापुरी काही तासांतच सुनीसुनी झाली.
सात दिवसांपासून माऊलींचा हा संजीवन सोहळा अलंकापुरीत भक्तिमय वातावरणात सुरू होता. राज्याच्या कानाकोप:यातून माऊलींचा संजीवन सोहळा तसेच कार्तिकी आळंदीची यात्र प्रत्यक्ष स्वत:च्या नयनांनी अनुभवण्यासाठी लाखो भाविकांची मांदियाळी अलंकापुरीत दाखल झाली होती. गुरुवारी माऊलींचा संजीवन समाधी सोहळा पार पडला. तर शनिवारी (दि. 22) या सोहळ्याचा छबिना व ‘श्री’ची पालखीतून नगरप्रदक्षिणा मिरवणूक काढून मोठय़ा उत्साहात सांगता झाली.
तत्पूर्वी, आज पहाटे तीनच्या सुमारास माऊलींची आरती, महापूजा करण्यात आली. दुधारती घेऊन आजच्या सांगता दिवसाला प्रारंभ करण्यात आला. पहाटे पाचपासून भाविकांच्या नियोजित पूजा पार पडल्या. त्यानंतर दर्शनबारीतून भाविकांना ‘श्रीं’च्या दर्शनासाठी सोडण्यात आले. दुपारी बारादरम्यान माऊलींना महानैवेद्य दाखविण्यात आला. या वेळी दर्शनबारी बंद करण्यात आली होती. सायंकाळी चार ते सहा या वेळात वीणामंडपात संस्थानाच्या वतीने शेकडो माउलीभक्तांच्या उपस्थितीत हरिकीर्तन पार पडले. रात्री आठ वाजता धूपारती घेऊन सोहळा सांगतेच्या मुख्य कार्यक्रमाला साडेनऊच्या सुमारास सुरुवात करण्यात आली.
‘श्रीं’ची विधिवत महापूजा करून मानक:यांच्या साह्याने ‘पुंडलीक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम.. पंढरीनाथ महाराज की जय’ असा जयघोष करून माऊलींना पंखा मंडपातून, करंज्या मंडप, वीणामंडपात आणण्यात आले. महाद्वारातून ‘श्रीं’चा छबिना सजविलेल्या पालखीतून नगरप्रदक्षिणोसाठी मार्गस्थ झाला, त्या वेळी पालखीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. ज्ञानदेव ज्ञानसागरू, ज्ञानदेव ज्ञानगुरु ।
ज्ञानदेव भवसिंधु तारु, प्रत्यक्ष रूप असे ।।
या ओवीप्रमाणो माऊलींच्या संजीवन समाधीनंतर ब्रrांडनायक भगवंत ज्ञानदेवांच्या समाधीला प्रदक्षिणा घालून पाणवलेल्या डोळ्यांनी नमस्कार करून ‘श्रीं’चे दर्शन घेऊन पंढरपूरस्थळी रवाना झाले; त्याप्रमाणो आज सांगतेच्या पूर्वसंध्येला अनेक भाविक माऊलींचे व पवित्र इंद्रायणीचे अखेरचे दर्शन घेऊन अलंकापुरीला निरोप देत होते. दिवसभरात बहुतांशी वारक:यांनी पवित्र इंद्रायणीत स्नान करून नगरप्रदक्षिणा घातली. भाविकांच्या परतण्यामुळे सात दिवसांपासून भाविकांनी गजबजलेला इंद्रायणीचा काठ व परिसर भाविकांच्या अभावी अगदी सुनासुना झाला होता. भाविकांना माऊलींचा हा विरह आता आषाढी वारीर्पयत सहन करावा लागणार आहे. (वार्ताहर)
4माऊलींच्या 718व्या संजीवन समाधी सोहळ्याची सुरुवात हैबतबाबांच्या पायरीपूजनाने झाली होती. मुख्य पहाटपूजा 18 नोव्हेंबरला, तर माऊलींचा संजीवन समाधी सोहळा 2क् नोव्हेंबरला पार पडला. तर, शनिवारी रात्री छबिना व ‘श्रीं’ची पालखीतून नगरप्रदक्षिणा मिरवणूक काढून मोठय़ा उत्साहात सांगता झाली. या सोहळ्यातील सर्व कार्यक्रमांना राज्यासह परराज्यांतील लाखो भाविकांनी उपस्थिती लावली होती.
4श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरमहाराजांचा संजीवन समाधी सोहळा, अर्थात कार्तिकी उत्सव 7 दिवस सुरू होता. राज्याच्या कानाकोप:यातून असंख्य भाविक-भक्तांची मांदियाळी हा आनंददायी सुखसोहळा प्रत्यक्ष नयनांनी अनुभवण्यासाठी अलंकापुरीत हजर झाली होती. चालू वर्षीच्या कार्तिकी सोहळ्यात भाविकांच्या उपस्थितीमध्ये कमालीची वाढ झालेली दिसून येत होती.
4शनिमंदिरापासून निघालेला हा छबिना हजेरी मारुतीजवळ येऊन काही वेळापुरता विसावला. विसावा घेऊन पुन्हा सोहळा पुढे मार्गस्थ झाला. कॉसमॉस बँक-नगर परिषद चौकामार्गे आजोळ घरासमोरून विष्णुमंदिराशेजारून इंद्रायणी घाटाकडून रात्री साडेबाराच्या सुमारास पालखी सोहळा मंदिराच्या महाद्वाराजवळ पोहोचला.
4वीणामंडपात आरती घेऊन माऊलींच्या पादुकांना शेजघरामध्ये स्थापन करून सोहळा सांगतेची शेजारती घेऊन सात दिवसीय सोहळ्याची विधिवत सांगता करण्यात आली. या प्रसंगी माऊलींच्या दर्शनासाठी असंख्य भाविक-भक्त मोठय़ा संख्येने उपस्थित होते. त्यामुळे आळंदी सुनी होण्यापूर्वी गजबजली होती.