शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

आळंदीच्या तरुणी, क्या छोरों से कम हैं..?

By admin | Updated: January 11, 2017 02:29 IST

राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळात विशेष कामगिरी करण्याच्या ध्येयाने प्रेरित होऊन पिंपरी, चिंचवड, भोसरी व आळंदी परिसरातील मुलींनी स्वत:ला खेळात

पिंपरी : राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळात विशेष कामगिरी करण्याच्या ध्येयाने प्रेरित होऊन पिंपरी, चिंचवड, भोसरी व आळंदी परिसरातील मुलींनी स्वत:ला खेळात झोकून दिले आहे. कुस्ती, कबड्डी, हॉकी, नेमबाजी, अ‍ॅथलेटिक्स अशा विविध खेळ प्रकारांत मैदान गाजविणाऱ्या महिला खेळाडूंचा आदर्श घेऊन तरुणींचा खेळाकडे कल वाढला आहे. आळंदीच्या तालमीत कुस्तीच्या सरावासाठी येणाऱ्या मुलींची संख्या वाढली आहे. पाच वर्षांपूर्वी तालमीत सराव करणाऱ्या अवघ्या तीन मुलींची संख्या आता ४५च्यावर गेली आहे. आॅलिम्पिक स्पर्धेत नेमबाजीत पदक जिंकणाऱ्या अनिसा सय्यद,अंजली भागवत, राही सरनोबत यांच्यासह आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेत चमकदार कामगिरी केलेली तळेगावची हर्षदा जाधव, आंतरराष्ट्रीय धावपटू भाग्यश्री बिले यांचा आदर्श ठेऊन मुलींचा खेळाकडे ओढा वाढला आहे. कबड्डीत बाजी मारलेल्या दीप्ती जोसेफ, तसेच आशियाई स्पर्धेत कुस्तीत सुवर्णपदकाची मानकरी ठरलेल्या वडमुखवाडीची अंकिता गुंड अशा खेळाडूंमुळे पुणे जिल्ह्यातील तरुणींना खेळाबद्दलचे आकर्षण निर्माण झाले आहे. कुस्तीसारख्या मर्दानी खेळात महिलाही कमी नाहीत, हे हरियाणाच्या फोगट भगिनींनी पटकाविलेल्या पदकांनी सिद्ध झाले आहे. त्यावर ‘दंगल’ चित्रपट प्रदर्शित झाला अहे. त्यामुळे तरुणींचा कुस्ती खेळाकडे कल वाढला आहे. आता पालकही मुलींना खेळाबद्दल प्रोत्साहन देऊ लागले आहेत. हा सकारात्मक बदल आहे, असे दिनेश गुंड यांनी सांगितले. (प्रतिनिधी)अंकिताने पटकावली १२ सुवर्णपदके आळंदीत सुरू केलेल्या तालमीत राज्याच्या विविध भागातून मुली दाखल झाल्या आहेत. वडमुखवाडीतील गुंड कुटुंबाला कुस्ती या खेळाचा वारसा आहे. आशियाई स्पर्धेत पदक मिळविणारी अंकिता ही आमच्या तिसऱ्या पिढीची प्रतिनिधी आहे. आशियाई स्पर्धेत अंकिता तीन वेळा सहभागी झाली आहे. राष्ट्रीय स्तरावर तिने १२ सुुवर्णपदक मिळवले आहेत. मनीषा देवकर हिने राष्ट्रीय स्तरावर १२ सुवर्णपदके प्राप्त केली आहेत. ज्युनिअर आशियाई स्पर्धेत रौप्यपदक मिळविले आहे. सोनाली तोडकरने राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्यपदक मिळवले आहे. आशियाई कॅडेट स्पर्धेत तिचा सहभाग राहिला आहे. विजय पवार यांचा आशियाई कॅडेट स्पर्धेत सहभाग राहिला आहे. अश्विनी मडवी,तनुजा अल्हाट, शीतल साठे, हर्षदा जाधव या खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभाग नोंदवला आहे.- दिनेश गुंड, कुस्ती प्रशिक्षक