शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

अकोल्यात एकाच कुटुंबातील पाच जणांनी केली आत्महत्या

By admin | Updated: April 21, 2015 12:46 IST

अकोला जिल्ह्यातील आस्टूल येथे एकाच कुटुंबातील पाच जणांनी आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी सकाळी घडली.

ऑनलाइन लोकमत

अकोला, दि. २१ - अकोला जिल्ह्यातील आस्टूल येथे एकाच कुटुंबातील पाच जणांनी आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी सकाळी घडली. पती, पत्नी व त्यांची तीन लहान मुले असे पाच जणांचे मृतदेह शेतात गळफास घेतलेल्या स्थितीत आढळले असून आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. 

पातूर तालुक्यातील आस्टूल येथे संजय इंगळे (वय ४५) व त्यांची पत्नी मनीषा इंगळे (वय ३५) हे दाम्पत्त्य राहत होते. इंगळे दाम्पत्त्याला तीन मुलं असून मुलगी ऐश्वर्या (वय १९) ही आयटीआयचे शिक्षण घेत होती.मयूरी (वय १७)  ही दहावीत शिकत होती तर मुलगा रोशन (वय १५) हा नववी इयत्तेत शिकत होता. इंगळे यांची गावात सामायिक शेती होती. मंगळवारी सकाळी संजय, मनीषा  या दोघांचे मृतदेह शेतातील एका झाडावर गळफास घेतलेल्या स्थितीत आढळले. तर ऐश्वर्या व मयूरीचे मृतदेह दोन वेगवेगळ्या ठिकाणी जमिनीवर पडलेले आढळले.रोशनचा मृतदेह शेतातील दुस-या आंब्याच्या झाडावर गळफास घेतलेल्या स्थितीत आढळला आहे. या पाचही जणांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र मुलींचे मृतदेह जमिनीवर आढळल्याने ही आत्महत्या आहे की अन्य काही प्रकार आहे असा संशय ग्रामस्थ व्यक्त करत आहे. पातूर पोलिस या घटनेचा तपास करत आहे.