शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अकोला पंचायत समितीच्या दोन अधिका-यांना अटक

By admin | Updated: June 8, 2016 02:27 IST

बोरगाव मंजू शेतरस्ता अपहारप्रकरणी आरोपींस तीन दिवसांची पोलीस कोठडी.

बोरगाव मंजू (जि. अकोला) : महाराष्ट्र राज्य रोजगार हमी योजनेंतर्गत झालेल्या कामामध्ये गैरव्यवहार केल्याप्रकरणी पंचायत समितीच्या दोन अधिकार्‍यांना बोरगाव मंजू पोलिसांनी मंगळवारी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सन २0१३ ते २0१५ या दरम्यान नऊ शेतरस्त्यांची कामे झाली होती. या कामांमध्ये हेराफेरी झाल्याची तक्रार झाल्यामुळे सहायक गटविकास अधिकार्‍यांनी या प्रकरणाची चौकशी केली. तपासादरम्यान या तक्रारीत सत्यता आढळली. यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी भादंविच्या कलम ४६७, ४६८, ४७१, ४७७, ४0९, ३४ अन्वये गुन्हे दाखल केले होते. या प्रकरणातील आरोपी आनंद रमेश जानोदकर (३८) हे अकोला पंचायत समितीमध्ये कार्यक्रम अधिकारी असताना, शेतकर्‍यांचे मस्टर तयार करण्याचे काम त्यांच्याकडे होते. त्यांनी एका मजुराचे नाव एकाच आठवड्यात दोन ठिकाणी लिहून शासकीय निधीचा अपहार केला, असा आरोप आहे. दुसरा आरोपी गणेश गुफालाल कहार हे पंचायत समिती येथे सहायक लेखाधिकारी होते. त्यांच्याकडे कुशल व अकुशल कामांसंबधी देयके तपासणीचे काम होते. त्यांनी चुकीची देयके मंजुरीसाठी पाठविली व कोणत्याही त्रुटी काढल्या नाहीत. दोन्ही आरोपी अधिकारी सध्या पोलिसांच्या ताब्यात असून, त्यांची तीन दिवसांची कोठडी घेण्यात आली आहे. दोन अधिकार्‍यांना अटक झाल्यामुळे या प्रकरणात सहभागी असलेल्या अधिकारी व कर्मचार्‍यांचे धाबे दणाणले आहे. यातील आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली असून, प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक भास्कर तवर व हेडकॉन्स्टेबल देवानंद दंदी करीत आहेत.