शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

अकोला बाजारपेठेत गावरान तिळावर संक्रांत

By admin | Updated: January 8, 2017 23:22 IST

संजय खांडेकर अकोला, दि. 8: गुजरातचे पॅकिंग तीळ ग्राहकांच्या पसंतीस उतरत असल्याने ऐन मकर संक्रांतीच्या सणावर अकोल्याच्या बाजारपेठेत गावरान ...

संजय खांडेकरअकोला, दि. 8: गुजरातचे पॅकिंग तीळ ग्राहकांच्या पसंतीस उतरत असल्याने ऐन मकर संक्रांतीच्या सणावर अकोल्याच्या बाजारपेठेत गावरान तिळावर संक्रांत आली आहे. नोटाबंदीनंतर थंडावलेला बाजार अजूनही सुधरला नसल्याने तिळगुळाचा पन्नास टक्के बाजार घसरला आहे.

जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात येणाऱ्या मकर संक्रातीच्या निमित्ताने जानेवारीपासूनच गूळ आणि तिळाला ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणात मागणी असते. त्यासाठी विदर्भाच्या आजूबाजूच्या जिल्ह्यातून गावरान तीळ अकोला बाजारात दरवर्षी येतो. साठ टक्के बाजार अकोल्यात गावरान तिळाचाच असतो; मात्र नोटाबंदीनंतर परिसरातील शेतकऱ्यांनी बाजारपेठेकडे पाठ फिरविली. पाहिजे त्या तुलनेत गावरान तीळ दाखल झाला नाही. दरम्यान, ही रिक्त जागा भरून काढण्यासाठी गुजरात येथील पॅकिंग तीळ अकोल्यात दाखल झाला आहे. ९५ ते १२० रुपये कि लोच्या गुजरात तिळला मागणी वाढल्याने गुजरातचे एबी, बीबी आणि व्हीबी हे तीन प्रकारच्या ब्रॅन्डची विक्री वाढली आहे.

गुजरातच्या तुलनेत गजर मिक्स आणि गावरान तीळ कमी भाव असूनही मागे पडली आहे. दरवर्षी अकोलाच्या बाजारपेठेत कोल्हापूर, अंकापल्ली, खजूर, लातूर आणि हिंगोलीचा गूळ येतो. ४० ते ६० रुपये कि लोपर्यंतचा गूळ सध्या बाजारात विक्रीला असला तरी हिंगोलीच्या चोरसपाटा आणि कोल्हापूरच्या सेंद्रियलाच चांगली मागणी आहे.

-विदर्भातील तिळाच्या स्पर्धेत दरवर्षी उत्तर प्रदेशची तीळ अकोला बाजारपेठेत दाखल होत असतो; मात्र थंडावलेला बाजार पाहता, परिसरातील शेतकऱ्यांनी गावरान तीळ आणला नाही. त्यामुळे गुजरातच्या तिळाची मागणी वाढली आहे. बाजारात मुबलक तीळ असला तरी पाहिजे तसा बाजार नाही.- सुशील पोतदार, किराणा बाजार अकोला.-होलसेल भावात कोल्हापूरचा गूळ विकत घेऊन काही लघू व्यावसायिक सेंद्रियच्या नावाने अकोलाच्या नागरी वसाहतीत ठिकठिकाणी गाड्या लावून विक्री करीत आहे. ते खरेच सेंद्रिय आहे का, याची चाचपणी ग्राहकाने करावी. सोबतच त्यांचे वजन काटे तपासावेत. कारण कमी भावात चांगल्या प्रतीचा गूळ मिळूच शकत नाही.-विजय तिवारी, दाणाबाजार, अकोला.

https://www.dailymotion.com/video/x844nmj