बुलडाणा /अकोला : या जिल्ह्यात शनिवारी सायंकाळी अवकाळी पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे हरभरा पिकाचे मोठे नुकसान झाले असून आंब्याचा मोहोरही गळाला आहे.शनिवारी बुलडाणा जिल्ह्यात सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. सायंकाळी पाचच्या सुमारास अवकाळी पावसाने हजेरी लावली. चिखली, मेहकर, मोताळा, संग्रामपूर, शेगाव या तालुक्यांत पाऊस झाला. अवकाळी पावसामुळे हरभरा पिकाचे नुकसान झाले. (प्रतिनिधी)
अकोला, बुलडाण्यात अवकाळी पाऊस
By admin | Updated: February 13, 2017 03:33 IST