शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

अकोला विमानतळाचा विस्तार अशक्य

By admin | Updated: August 7, 2014 23:01 IST

विमानतळ प्राधिकरण : हायकोर्टात पत्र सादर

अकोला : विकासकामांसाठी जमीनच उपलब्ध नसल्यामुळे अकोला येथील शिवनी विमानतळाचा विस्तार करणे अशक्य आहे, असे भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे कार्यकारी संचालक (योजना) कल्पना सेठी यांनी राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाचे अतिरिक्त सचिव पी. एस. मिना यांना पत्र लिहून कळविले आहे. विमानतळाच्या विस्तारीकरणाविरुद्ध विदर्भ असोसिएशन फॉर रिसर्च टेक्नॉलॉजी अँड डेव्हलपमेंट इन अँग्रीकल्चरल अँड रुरल सेक्टरचे अध्यक्ष डॉ. बळवंत बथकल यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल केली आहे. याचिकाकर्त्याचे वकील फिरदोस मिर्झा व तेजस देशपांडे यांनी आज, बुधवारी न्यायालयासमक्ष प्राधिकरणाचे पत्र सादर केले. राज्य शासनाने गेल्या ४ मार्च रोजी ह्यजीआरह्ण काढून डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाला शिवनी विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी ६0.६८ हेक्टर जमीन हस्तांतरित करण्याचे निर्देश दिले आहेत. ही जमीन कृषी संशोधनाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाची आहे. जमिनीवर विविध विभागाच्या इमारती, सिंचन प्रणाली, तलाव, विहिरी, फळझाडे व कृषी संबंधित अनेक प्रकारची लागवड केलेली आहे. शासनाने जमीन हस्तांतरणाचा ह्यजीआरह्ण काढताना होणार्‍या नुकसानाचा विचारच केलेला नाही. शिवनी विमानतळापासून अमरावती येथील बेलोरा विमानतळ केवळ ७५ किलोमीटर अंतरावर आहे. ४११.१९ हेक्टर जमीन अधिग्रहित करून बेलोरा विमानतळाचे विस्तारीकरण करण्यात आले आहे. यामुळे शिवनी विमानतळाच्या विस्तारीकरणाची गरज नाही. या विमानतळावर वर्षातून एक-दोनवेळाच राजकीय नेत्यांची खासगी विमाने उतरतात. प्राधिकरणच्या धोरणानुसार १५0 किलोमीटरच्या परिसरात २ विमानतळांना मान्यता दिली जाऊ शकत नाही, असे याचिकेत नमूद करण्यात आले आहे.