शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अकलूज जि़ प़ गट : सासू सुनेची लढत लक्षवेधी ठरणार

By admin | Updated: February 16, 2017 18:29 IST

अकलूज जि़ प़ गट : सासू सुनेची लढत लक्षवेधी ठरणार

अकलूज जि़ प़ गट : सासू सुनेची लढत लक्षवेधी ठरणारराजीव लोहकरे - अकलूज :

माळशिरस तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या अकलूज जि़ प़ गटाने मोहिते-पाटील गटाचा झेंडा अखंडितपणे डामडौलाने फडकवित ठेवला आहे़ मात्र या गटात यावेळी प्रथमच मोहिते-पाटील घराण्यातील पद्मजादेवी मोहिते-पाटील या शिवसेनेकडून तर शीतलदेवी मोहिते-पाटील राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवित असल्याने सासू विरुध्द सून अशी होणारी रंगतदार लढत लक्षवेधी ठरत आहे.सोलापूर जिल्हा परिषदेचा अकलूज गट हा राजकीय राजधानी म्हणून ओळखला जातो. या गटात आजतागायत मोहिते-पाटील गटाचे वर्चस्व राहिले आहे़ या गटातून लोकनेते स्व. प्रतापसिंह मोहिते-पाटील व फत्तेसिंह माने-पाटील यांनी जिल्हा परिषद अध्यक्षपद, धैर्यशील मोहिते-पाटील यांनी जि़ प़ चे पक्षनेतेपद तर नामदेवराव गायकवाड यांनी समाज कल्याण व मुमताज पठाण यांनी महिला बालकल्याण समितीचे सभापती पद भूषविले आहे़ मोहिते-पाटील गटाचा बालेकिल्ला असलेला अकलूज जि़ प़ गट यावेळी जि़ सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित झाला़ त्यामुळे या गटातून शिवसेनेच्या पद्मजादेवी मोहिते-पाटील व राष्ट्रवादीच्या शीतलदेवी मोहिते-पाटील या मोहिते-पाटील घराण्यातील सासू व सून एकमेकींच्या विरोधात निवडणूक रिंगणात आहेत़ त्यामुळे या लढतीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.पद्मजादेवी मोहिते-पाटील या यापूर्वी २००७ साली राष्ट्रीय काँग्रेसकडून यशवंतनगर जि़ प़ गटातून विजयी होऊन सोलापूर जिल्हा परिषदेच्या विरोधी पक्ष नेत्या झाल्या होत्या़ राष्ट्रवादीच्या उमेदवार शीतलदेवी मोहिते-पाटील या शिवरत्न फाऊंडेशन व डॉटर्स मॉम फाऊंडेशनच्या माध्यमातून समाजकारण करतात. त्यांचे पती धैर्यशील मोहिते-पाटील हे सध्याचे जि़ प़ अकलूज गटाचे सदस्य असून पक्षनेतेपदी कार्यरत आहेत़