शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरच्या अखिलेशचा आयक्यू = आईनस्टाईन आयक्यू

By admin | Updated: July 5, 2016 17:16 IST

विज्ञानाला नवी दिशा देणारे थोर शास्त्रज्ञ अल्बर्ट आईनस्टाईन आणि स्टिफन हॉकिंग्ज यांच्या बुद्धिमत्तेला तोड नाही

जागतिक दर्जाच्या ह्यआयक्यूह्ण चाचणीत नागपूरकर विद्यार्थ्याची दिग्गजांशी बरोबरी : वय वर्षे अवघे ११ ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. ५ : विज्ञानाला नवी दिशा देणारे थोर शास्त्रज्ञ अल्बर्ट आईनस्टाईन आणि स्टिफन हॉकिंग्ज यांच्या बुद्धिमत्तेला तोड नाही. भल्याभल्या संशोधकांना त्यांच्या पातळीवर येणे जमले नाही. परंतु नागपूरकर विद्यार्थ्याने ही कमाल करुन दाखविली आहे. त्याचा आयक्यू (इंटेलिजन्स कोशन्ट) हा आईन्स्टाईन व हॉकिंग्ज यांच्याइतकाच असल्याचे सिद्ध झाले आहे. अवघ्या ११ वर्षाच्या अखिलेश चांदोरकर याने ही किमया केली आहे.

आंतरराष्ट्रीय पातळीवरील उच्चआयक्यू असलेल्या व्यक्तींची संस्था ह्यमेन्साह्णच्या चाचणीत त्याने या दोन्ही महान संशोधकांच्या ह्यआयक्यूह्णइतकेच गुण मिळविले आहेत. बौद्धिक क्षमतेत उजवे असणाऱ्या जगातील २ टक्के लोकांमध्ये त्याचा समावेश झाला आहे. आईनस्टाईन व हॉकिन्स या दोघांचाही ह्यआयक्यूह्ण १६० होता. अखिलेशचा ह्यआयक्यूह्णदेखील तितकाच आला आहे.

नागपूरातील जैन इंटरनॅशनल स्कूलचा विद्यार्थी असलेल्या अखिलेशचे प्राथमिक शिक्षण स्कॉटलंडला झाले. त्याचे वडील ऋत्विक व आई सोनाली यांनी लहानपणीच अखिलेशमधील बुद्धिमत्ता हेरली होती. मागील वर्षी जूनमध्ये सुट्यांसाठी ह्यस्कॉटलंडह्ण येथे गेला असता अखिलेशने ह्यमेन्साह्णची परीक्षा दिली व त्यात त्याला हे यश मिळाले. काय आहे ह्यमेन्साह्ण चाचणी ?मेन्सा सोसायटीची स्थापना आॅक्सफोर्ड येथे १९४६ साली करण्यात आली होती. आॅस्ट्रेलियन वंशाचे बॅ.रोलेन्ड बॅरिल व संशोधक लान्स वारे यांनी मिळून ही संस्था सुरू केली होती. या संस्थेत जगातील सर्वोत्तम ह्यआयक्यूह्ण असलेल्या २ टक्के लोकांनाच सदस्यत्व देण्यात येते.

मेन्सातर्फे घेण्यात येणारी चाचणी ह्यआयक्यूह्ण मोजण्यासाठी जगभरात मान्यताप्राप्त आहे. ही चाचणी देण्यासाठी किमान १० वर्षे वय असणे आवश्यक आहे. या चाचणीत वयस्क व्यक्तीला जास्तीत जास्त १६१ अंक दिले जातात, तर किशोरवयीन मुलांना १६२ अंक देण्यात येतात.