मूर्तिजापूर (अकोला): मूर्तिजापूर येथे १४ ते १८ ऑगस्टदरम्यान अखिल भारतीय किन्नर (तृतिय पंथीय) मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यासाठी देशभरातून किन्नर मूर्तिजापूरमध्ये येणार आहेत.देशभरात अनेक शहरांमध्ये नगरसेवक, नगराध्यक्ष, महापौर यासह अनेक महत्त्वाच्या पदांवर तृतिय पंथीय अर्थात किन्नर कार्यरत आहेत. देशभरातील या किन्नरांचा मेळावा मूर्तिजापूर येथे १४ ते १८ ऑगस्टदरम्यान सिंधी कॅम्पमधील सिंधी समाज भवनात होत आहे. विश्वात शांतता नांदावी यासाठी या मेळाव्यात प्रार्थना केली जाणार आहे. १८ ऑगस्ट रोजी मूर्तिजापूर शहरात माता राणीची कलश यात्रा काढण्यात येणार असल्याची माहिती मूर्तिजापूर येथील किन्नर नेहा गुरुदिलजान यांनी दिली.
अकोला जिल्ह्यात शुक्रवारपासून अखिल भारतीय किन्नर मेळावा
By admin | Updated: August 11, 2015 22:47 IST