शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

अजमेर एक्स्प्रेसमध्ये बॉम्बच्या अफवेने धावपळ

By admin | Updated: May 12, 2016 00:16 IST

कसून तपासणी : एक्स्प्रेसला सात तासांचा विलंब

मिरज : म्हैसूर-अजमेर एक्स्प्रेसमध्ये बॉम्ब असल्याची माहिती अज्ञाताने रेल्वेच्या पुणे नियंत्रण कक्षाला दिल्याने मिरज रेल्वे स्थानकात अजमेर-एक्स्प्रेसची कसून तपासणी करण्यात आली. पण रेल्वेत काहीही आढळले नाही. बॉम्बच्या अफवेमुळे रेल्वेला मात्र सात तास विलंब झाला. म्हैसूर येथून येणाऱ्या अजमेर एक्स्प्रेसच्या जनरल बोगीत बॉम्ब असल्याची माहिती अज्ञाताने रेल्वे सुरक्षा दलाच्या पुणे नियंत्रण कक्षाला आज सकाळी दिली. एक्स्प्रेस हुबळीतून निघाली असल्याने नियंत्रण कक्षाने याबाबत दक्षिण-पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली. अजमेर एक्स्प्रेसची बेळगावजवळ देसूर स्थानकावर व बेळगाव स्थानकावर पोलिस व बॉम्बशोधक पथकाद्वारे तपासणी करण्यात आली. दोन्ही स्थानकांवर तपासणीसाठी थांबविण्यात आल्याने अजमेर एक्स्प्रेसला सात तासांचा विलंब झाला. यामुळे दुपारी एक वाजता येणारी एक्स्प्रेस रात्री आठ वाजता मिरजेत आली. मिरजेतही तपासणीचे आदेश असल्याने रेल्वे सुरक्षा दल, रेल्वे पोलिस, गांधी चौक पोलिस, बॉम्बशोधक पथक व श्वानांच्या साहाय्याने एक्स्प्रेसची कसून तपासणी करण्यात आली. तपासणीत बॉम्ब असल्याची अफवा असल्याचे निष्पन्न झाले. विलंबामुळे प्रवासी मात्र हैराण झाले होते. (वार्ताहर)