शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

अजित पवार, तटकरे यांच्या चौकशीचे काय?

By admin | Updated: July 16, 2016 03:21 IST

सिंचन घोटाळ्यातील आरोपींची लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत खुली चौकशी करणार, असे राज्य शासनाने जाहीर केले होते. त्याचे काय झाले, अशी विचारणा करत याबाबत दोन आठवड्यांत अहवाल सादर

नागपूर : सिंचन घोटाळ्यातील आरोपींची लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत खुली चौकशी करणार, असे राज्य शासनाने जाहीर केले होते. त्याचे काय झाले, अशी विचारणा करत याबाबत दोन आठवड्यांत अहवाल सादर करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य सरकारला दिले. या घोटाळ्यात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार व माजी मंत्री सुनील तटकरे हे आरोपी आहेत. सिंचन प्रकल्पांतील गैरव्यवहारांची सीबीआयमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी विनंती करणारी याचिका जनमंच या स्वयंसेवी संस्थेने नागपूर खंडपीठात दाखल केली आहे. त्यावर १२ डिसेंबर २०१४ रोजी झालेल्या सुनावणीत राज्याचे तत्कालीन महाधिवक्ता सुनील मनोहर यांनी ‘सिंचन घोटाळा’प्रकरणी अजित पवार व सुनील तटकरे आणि ‘महाराष्ट्र सदन घोटाळा’प्रकरणी छगन भुजबळ यांची एसीबीमार्फत खुली चौकशी करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला असल्याचे निवेदन न्यायालयात केले होते. या प्रकरणी गुरुवारी न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व विनय देशपांडे यांच्या समक्ष झालेल्या सुनावणीदरम्यान याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. फिरदोस मिर्झा यांनी तत्कालीन महाधिवक्त्यांच्या निवेदनाचा उल्लेख करून अद्याप अजित पवार व सुनील तटकरे यांच्याविरोधात शासनाने गुन्हा दाखल केलेला नाही, ही बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. जर आरोपींची चौकशी होऊन निधी परत मिळवला तर रखडलेले प्रकल्प पूर्ण करण्यासाठी निधी उपलब्ध होईल, असे म्हणत संबंधित चौकशीची सद्य:स्थिती राज्य शासनाने मांडावी, अशी विनंतीही त्यांनी केली. न्यायालयाने ही विनंती मान्य केली व अजित पवार, सुनील तटकरे व छगन भुजबळ यांच्या चौकशीचा वर्तमान अहवाल दोन आठवड्यांत सादर करण्याचे निर्देश दिले. राज्य शासनातर्फे मुख्य सरकारी वकील भारती डांगरे तर ‘व्हीआयडीसी’तर्फे वरिष्ठ अधिवक्ता सुनील मनोहर यांनी बाजू मांडली. (प्रतिनिधी)लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने आतापर्यंत गोसेखुर्द प्रकल्पातील गैरव्यवहार प्रकरणात विदर्भात २ तर रायगड जिल्ह्यातील बाळगंगा आणि काळू धरण गैरव्यवहार प्रकरणी १२ अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल केले आहेत.तसेच महाराष्ट्र सदन बांधकाम घोटाळा व अपसंपदाप्रकरणी छगन भुजबळ यांच्याविरुद्ध सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) गुन्हा दाखल केला असून, त्यांना अटक केली आहे. सध्या ते कोठडीत आहेत.