शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
4
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
5
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
6
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
7
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
8
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
9
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
10
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
11
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
12
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
13
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
14
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
15
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
18
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
19
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
20
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
Daily Top 2Weekly Top 5

अजित पवार यांच्यावर मनी लाँड्रिंगचा गुन्हा नाही

By admin | Updated: September 25, 2015 03:32 IST

बाळगंगा सिंचन प्रकल्पातील कथित गैरव्यवहार प्रकरणी माजी पाटबंधारे मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या विरोधात अंमलबजावणी संचालनालयाने कुठलाही गुन्हा दाखल केलेला नाही

मुंबई : बाळगंगा सिंचन प्रकल्पातील कथित गैरव्यवहार प्रकरणी माजी पाटबंधारे मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या विरोधात अंमलबजावणी संचालनालयाने कुठलाही गुन्हा दाखल केलेला नाही, असे ईडीच्या सूत्रांनी स्पष्ट केले.बाळगंगा सिंचन प्रकल्पासंदर्भात माजी पाटबंधारे मंत्री अजित पवार व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत (एसीबी) खुली चौकशी सुरू आहे; मात्र अद्याप त्यांच्यावर कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही. शिवाय, नजीकच्या काळात समन्स बजावण्याची शक्यता नाही. त्यांच्याकडून काही माहिती हवी असल्यास त्यांच्या प्रतिनिधींकडून मागवण्यात येईल, असे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी ‘लोकमत’ला सांगितले. आम्ही विचारलेल्या प्रश्नांची आम्हाला केवळ उत्तरे मिळणे अपेक्षित आहे, त्यांची वैयक्तिक उपस्थिती नव्हे. आमच्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत तर आम्ही स्पष्टीकरण मागतो. आम्ही याबाबत कसलीही घाई करणार नाही. त्यांना उत्तरे देण्यासाठी पुरेसा वेळ देणार आहोत, असेही दीक्षित यांनी सांगितले. मनी लाँड्रिंगच्या प्रकरणाची अंमलबजावणी संचालनालय (ईडी) चौकशी करीत असून, त्यांनीही अजित पवार यांना दोषी धरलेले नाही. एसीबीने दाखल केलेल्या एफआयआरच्या आधारावर ईडीने ईसीआयआर दाखल केला असून, त्यात केवळ कंत्राटदार आणि कोकण पाटबंधारे विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. दरम्यान, बाळगंगा सिंचन घोटाळ्यातील कंत्राटदार एफ.ए. इंटरप्रायझेसला २५ कोटी व त्यापेक्षा अधिकची कंत्राटे मिळावीत यासाठी वर्ग ‘अ’ दर्जा दिल्याबद्दलची फाईल गहाळ करण्यात आल्याचे स्पष्ट झाले असून, या प्रकरणी सा.बां. विभागाचे तत्कालीन कार्यकारी अभियंता अनिलकुमार गायकवाड यांच्यासह एफ.ए. इंटरप्रायझेसच्या संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गायब करण्यात आलेल्या फायलीवर सा.बां. विभागातील अधिकाऱ्यांचे नोटिंग होते, त्याचा तत्कालीन पाटबंधारेमंत्री अजित पवार यांच्याशी कसलाही संबंध नाही, असे एसीबीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. (विशेष प्रतिनिधी)