ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. २७ - पुण्यातील ख्यातनाम पंचशील हॉटेल्सचे चेअरमन अजय चोरडिया यांनी सोमवारी दुपारी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चिंचवड येथील डबल ट्री या हॉटेलमध्ये चोरडिया यांनी आत्महत्या केली असून आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
पंचशील हॉटेल्सचे चेअरमन अजय चोरडिया यांनी सोमवारी दुपारी चिंचवडमधील डबल ट्री या त्यांच्याच मालकीच्या हॉटेलमध्ये दुस-या मजल्यावरील एका खोलीत आत्महत्या केली. अजय चोरडिया हे पुणे व पिंपरी - चिंचवडमधील बांधकाम व हॉटेल व्यावसायिक ईश्वरदास चोरडिया यांचे पुत्र आहेत. तर अभय चोरडिया हे त्यांचे बंधू आहेत. चोरडिया कुटुंब हे शरद पवार यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. तीन वर्षांपूर्वी पंचशील हॉटेल्समधील शेअर्सविषयी शरद पवारांनी चुकीची माहिती दिल्याचा दावा केला गेला होता. त्यानंतर पंचशील ग्रूप चर्चेत आला होता.