शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

वायुगळतीने वरळी नाका परिसरात घबराट

By admin | Updated: July 18, 2014 02:57 IST

दक्षिण मुंबईतील वरळी नाका परिसरात गुरुवारी दुपारी झालेल्या वायुगळतीमुळे स्थानिक परिसरात एकच घबराट पसरली

मुंबई : दक्षिण मुंबईतील वरळी नाका परिसरात गुरुवारी दुपारी झालेल्या वायुगळतीमुळे स्थानिक परिसरात एकच घबराट पसरली. मात्र वेळेवर दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या जवानांसह महानगर गॅस लिमिटेडच्या कर्मचाऱ्यांनी यावर नियंत्रण मिळविल्यानंतर स्थानिकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.महापालिका नियंत्रण कक्षाकडून मिळालेल्या माहितीनुसार, वरळी नाका येथील शिवसेना पक्ष कार्यालयाच्या परिसरात गुरुवारी दुपारी महानगर गॅस पाइपलाइनच्या मुख्य लाइनमधून अचानक वायुगळती होऊ लागली. ही घटना समजताच स्थानिकांनी याची माहिती नियंत्रण कक्षाला दिली. शिवाय दरम्यानच्या काळात येथील परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले. येथील परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी परिसरातील वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. कालांतराने अग्निशमन दलाच्या जवानांनी येथील वायुगळतीवर नियंत्रण मिळवित स्थानिकांना दिलासा दिला.दरम्यान, महानगर गॅसकडून मिळालेल्या माहितीनुसार, सीएनजीच्या आउटलेटमध्ये छोटासा तांत्रिक बिघाड झाल्याने ही वायुगळती झाली. हा प्रकार लक्षात येताच खबरदारी म्हणून येथील गॅसपुरवठा तात्पुरता बंद करण्यात आला. शिवाय परिसरही रिकामा करण्यात आला. त्यामुळे जीवित आणि वित्तहानी झालेली नाही. शिवाय कंपनीच्या अभियंत्याच्या वतीने दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले असून, पुरवठा पूर्ववत करण्यात येईल. (प्रतिनिधी)