शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

विमानतळावर कडेकोट बंदोबस्त

By admin | Updated: January 6, 2015 01:04 IST

विमान अपहरणाचा इशारा मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर हाय अलर्ट घोषित करण्यात आला असून, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर अधिक कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे.

हाय अलर्ट : सशस्त्र जवानांची संख्या वाढवली नागपूर : विमान अपहरणाचा इशारा मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर हाय अलर्ट घोषित करण्यात आला असून, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर अधिक कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे.नागपुरातील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या सुरक्षेसाठी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दला(सीआयएसएफ)चे जवान तैनात असतात. परंतु सध्या या सशस्त्र जवानांची संख्या वाढवण्यात आली आहे. एखादा दहशतवादी हल्ला परतवून लावू शकतील, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. सीआयएसएफच्या क्यूआरटीचे कमांडो अत्याधुनिक शस्त्रांनी विमानतळावर सज्ज ठेवण्यात आले आहेत. विमानतळावर येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची तपासणी केली जात आहे. यासोबतच सिक्युरिटी होल्ड एरियात दोनदा तपासणी केली जात आहे. विमानतळाच्या सीमेवरील सर्व १७ वॉच टॉवरवरून बारीक लक्ष ठेवले जात आहे. तसेच विमानतळाच्या आतील भागात पेट्रोलिंगद्वारा नजर ठेवली जात आहे. सीआयएसएफ चे दोन ‘डॉग स्क्वॉड’सुद्धा बंदोबस्तासाठी लावण्यात आले आहेत. दोन स्निफर डॉगसुद्धा प्रवाशांच्या सामानांची तपासणी करीत आहे. टर्मिनल बिल्डिंगमधील लाऊंजसह ड्रॉप अ‍ॅण्ड गो झोन आणि पार्किंगमधील सामान व वाहनांची तपासणी डॉग स्क्वॉडद्वारा केली जात आहे. महिला प्रवाशांच्या तपासणीसाठी सीआयएसएफच्या महिला कमांडोंना तैनात करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)‘सिक्युरिटी पॅटर्न’मध्ये बदलगेल्या काही दिवसांपासून हाय अलर्टसंबंधात निर्देश प्राप्त झाले आहेत. विमानतळाला पूर्णपणे सुरक्षित ठेवण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. त्यासाठी सुरक्षा पद्धतीत काही बदलसुद्धा करण्यात आले आहेत. परंतु ते सांगता येणार नाही. कुठल्याही प्रकारच्या हल्ल्याला प्र्रत्युत्तर देण्यासाठी आम्ही तयार आहोत. कुठलेही वाहन किंवा वस्तू खूप वेळपासून बेवारस आढळून आल्यास तत्काळ अधिकाऱ्यांना सूचना द्या. एअरलाईन्सच्या स्टाफलासुद्धा यासंबंधात सांगण्यात आले आहे. - सुधीर कुमार, कमांडंट - सीआयएसएफ नागपूर विमानतळ