शहरं
Join us  
Trending Stories
1
Cough Syrup Case : विषारी 'कोल्ड्रिफ' कफ सिरप बनवणाऱ्या कंपनीच्या मालकाला अटक! औषध प्यायल्याने २० मुलांचा मृत्यू
2
तेजस्वी मुख्य चेहरा, एक-दोन नव्हे तर एवढे उपमुख्यमंत्री...! बिहारमध्ये महाआघाडीनं तयार केला जागा वाटपाचा असा फॉर्म्यूला
3
बिहार निवडणुकीपूर्वी NDA मध्ये रस्सीखेच; स्वत:ला मोदींचा हनुमान म्हणवणारा नेता का आहे नाराज?
4
अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर; भारतीय अधिकाऱ्यांसमोर मोठा पेच, कारण काय?
5
पुण्यात पुन्हा दहशतवादी?; ATS आणि पुणे पोलिसांकडून कोंढवा परिसरात रात्रभर सर्च ऑपरेशन
6
इस्रायल-हमास शांतता करार: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा दोघांचीही सही मिळविली, युद्ध थांबणार?
7
आजचे राशीभविष्य-९ ऑक्टोबर २०२५: आनंदोत्सव साजरा करण्याचा दिवस; व्यवसाय-नोकरीत होईल लाभ!
8
दोन शिवसेनेतल्या सततच्या भांडणांचा फायदा कोणाला?
9
संपादकीय: दिलासा तूर्त, चिंता शाश्वत! कर्जमाफीचा उच्चार न करता दिलेले पॅकेज...
10
पाकवर हल्ला कोणाच्या सांगण्यामुळे राेखला? पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचा काॅंग्रेसला सवाल
11
उद्योगांवर विजेचा ‘गुपचुप’ हल्ला, राज्यात स्थिती आणखी बिकट; प्रति युनिट दर ११.१५ रुपयांवर 
12
वाहनचालकांनो सावधान! विना हेल्मेट, राँग साइड, प्रखर दिव्यांविरुद्ध कठोर कारवाई करा : सुप्रीम कोर्ट
13
इलेक्ट्रिक कार विक्रीत दुप्पट वाढ; सप्टेंबरमध्ये नवा विक्रम; १५ हजार इव्हींची विक्री
14
‘६० कोटी जमा करा, मग याचिकेवर विचार’; शिल्पा शेट्टीवर न्यायालय संतापले...
15
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाण कुणाचा? १२ नोव्हेंबरला सुनावणी   
16
भाजपकडून लोकप्रिय चेहऱ्यांना संधी; गायिका मैथिलीस पक्षाची उमेदवारी? डॅमेज कंट्रोल मोड ऑन
17
एक जीबी डेटा आता चहाच्या एका कपापेक्षाही स्वस्त झाला आहे : मोदी
18
आता स्मार्ट चष्म्याने पाहा, बोला अन् पैसे द्या; फोनशिवाय अन् पिन न टाकता करता येणार व्यवहार 
19
प्रा. कितागावा, रॉबसन अन् याघी यांना नोबेल; मेटल-ऑर्गेनिक फ्रेमवर्कसाठी रसायनशास्त्रातील पुरस्कार 
20
भारताशी युद्ध झाल्यास आम्हीच बाजी मारणार; पाकचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची दर्पोक्ती

‘घोडावत ग्रुप’ची बेळगावातून विमानसेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2017 01:13 IST

जानेवारीपासून प्रारंभ : ५० सीटर विमान खरेदी करार; कोल्हापुरातून ने-आण करण्यासाठी खास व्यवस्था

लोकमत न्यूज नेटवर्क --कोल्हापूर : संजय घोडावत ग्रुपतर्फे जानेवारीपासून बेळगावमधून हवाई सेवेला प्रारंभ केला जाणार आहे. ‘स्टार एअर’ या हवाई सेवेसाठी ‘एम्ब्रार-ई. आर.’ ‘जे. १४५ एल. आर.’ या दोन ५० सीटर विमानांच्या खरेदीचा करारही नुकताच झाला. बेळगावमधील सांबरा विमानतळावरून पहिल्या टप्प्यात मुंबई, दिल्ली, चेन्नई, तिरूपती अशी हवाई सेवा सुरू केली जाईल. या हवाई सेवेमुळे कोल्हापूर जिल्ह्यासह कर्नाटकातील औद्योगिक, शैक्षणिक, राजकीयसह इतर क्षेत्रांच्या विकासाला चालना मिळणार आहे. कोल्हापुरातून बेळगाव विमानतळापर्यंत प्रवाशांची ने-आण करण्यासाठी विशेष बससेवाही सुरू केली जाणार आहे.हवाई उड्डाण मंत्रालयातून त्यासाठी आवश्यक बाबींची पूर्तता केली गेली आहे. येत्या पाच-सहा महिन्यांत उर्वरित काही कायदेशीर बाबी पूर्ण होतील. संजय घोडावत ग्रुपने याआधी कोल्हापुरातून हवाई सेवेची परवानगी शासनाकडे मागितली होती. जवळपास सहा वर्षे यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. रन-वे, नाईट लँडिंग तसेच टर्मिनल बिल्डिंगच्या सुविधा शासन पातळीवरून उपलब्ध होऊ न शकल्याने हा प्रस्ताव मागे पडला तरीही विमानतळ विकसित करून द्या, व्यवस्थापन करू, असा प्रस्ताव ‘घोडावत ग्रुप’ने दिला होता. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यासह परिसराचा विकास अधिक गतीने होऊ शकणार होता. मात्र, तसे झाले नाही. त्यानंतर घोडावत ग्रुपने बेळगावच्या सांबरा विमानतळाकडे लक्ष केंद्रीत केले. नोव्हेंबर २०११ पूर्वी ‘किंगफिशर एअरलाईन्स’ची सेवा कोल्हापूर विमानतळावरून सुरू होती. मात्र काही काळानंतर ही सेवा बंद झाली. त्याचा औद्योगिक विकासाला फटका बसून मोठ्या कंपन्यांनी कोल्हापूरकडे पाठ फिरविली. अशा स्थितीत घोडावत ग्रुप बेळगावमधून हवाई सेवेस प्रारंभ करत आहे. बेळगाव जिल्ह्याच्या अविकसित भागाचा विकासही या प्रकल्पामुळे साधला जाणार आहे.दिल्ली, मुंबईसह मोठ्या शहरांना जोडणारबेळगावमधून पहिल्या टप्प्यात दिल्ली, मुंबईसह विविध प्रमुख मोठ्या शहरांना हवाई सेवेने जोडले जाणार आहे. टप्प्या-टप्प्याने देशातील प्रमुख शहरेदेखील जोडली जाणार आहेत. बेळगाव-दिल्ली या मार्गावरील ५२ तासांचा प्रवास हवाई मार्गावरून केवळ अडीच तासांत, तर बेळगाव-तिरूपती हा बारा तासांचा प्रवास अवघ्या दीड तासांत पूर्ण होणार आहे.घोडावत ग्रुपने हवाई सेवेच्या माध्यमातून मोठे लक्ष्य गाठण्याचा प्रयत्न केला आहे. त्यातून ग्रुपचा लौकिक वाढण्यास मदत होणार असून भविष्यात ‘स्टार एअर’ यशस्वी झेप घेईल. या हवाई सेवेमुळे कोल्हापूरसह कर्नाटकातील औद्योगिक, शैक्षणिक व पर्यटनाला गती मिळण्यास मदत होणार आहे. आंतरराष्ट्रीय हेलिकॉप्टर पायलट परवानाही नुकताच मिळाला असून स्वत:चे हेलिकॉप्टर चालविणारे देशातील तिसऱ्या उद्योगपती बनण्याचा मान मिळाला आहे. हवाई सेवेचे गेल्या अनेक वर्षांचे स्वप्न लवकरच पूर्ण होत आहे. याचा आनंद वाटतो.- संजय घोडावत, उद्योगपती