शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलले जाणार, नवे नाव काय असणार? CM देवेंद्र फडणवीस म्हणाले...
2
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
3
IND vs ENG : गौतम गंभीरने Live सामन्यात दिली शिवी; अपशब्द उच्चारतानाचा Video झाला व्हायरल
4
ठाकरे गटाला पुन्हा कोकणात मोठा धक्का; बडे पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा रामराम, भाजपात प्रवेश
5
भारताच्या शेअर बाजारात घसरण, पण पाकिस्तानच्या स्टॉक मार्केटमध्ये तुफान तेजी; १,३५,००० अंकांच्या पार, कारण काय?
6
"पहाटे ४ वाजता उठतो, रात्री ८ ला झोपतो", लेकाची शिस्त पाहून आर माधवनही होतो दंग; म्हणाला...
7
IND vs ENG :दुखापतग्रस्त पंत 'डिफेन्स' करताना फसला! जोफ्रा आर्चरची 'वेदनादायी' गोलंदाजी
8
Viral Video: चक्क माणसासारखं दोन पायावर उभा राहिला बिबट्या; स्वत: बघितल्याशिवाय विश्वास बसणार नाही!
9
"राज ठाकरे मराठीच्या नावावर द्वेष पसरवतात, त्यांच्यावर रासुका लावा’’, मुंबई हायकोर्टातील वकिलांची मागणी  
10
DSP सिराजला इंग्लिश बॅटर बेन डकेटशी पंगा घेणं पडलं महागात! ICC नं फाडलं 'चलान'
11
मुंबई-पुण्यात घरं घेणाऱ्यांसाठी गुडन्यूज! मालमत्ता विक्रीत ३०% घट; 'या' कारणामुळे किमती खाली येणार!
12
भयंकर! कर्ज फेडण्यासाठी, विम्याचे २ कोटी हडपण्यासाठी मित्राची केली हत्या, जिवंत जाळलं अन्...
13
अनिल अग्रवाल याच्या वेदांतानं भाजपला चार पट जास्त देणगी दिली, काँग्रेसच्या देणगीत मोठी घट, रिपोर्टमधून खुलासा
14
एकनाथ शिंदेंना ‘संजय’ लाभदायक नाही? विरोधकांनी कोंडी केली; पक्षाची डोकेदुखी वाढली!
15
Karka Sankranti 2025 : कर्क संक्रांतीला 'या' पाच राशींच्या आयुष्यात होईल मोठे संक्रमण; येतील अच्छे दिन!
16
“एसटीचे कदापि खाजगीकरण होऊ देणार नाही”; परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
17
निमिषा प्रियाची फाशी आता अटळ? ब्लड मनीसाठी ठाम नकार; सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं?
18
आधी कोट्यवधी रुपयांचे घर पाडले, आता प्रशासन छांगूर बाबाकडून पाडण्याचा खर्च ८ लाख ५५ हजार रुपये वसूल करणार
19
Ahilyanagar: पोलिसांना बघून धरणात मारल्या उड्या, एका चोराचा बुडून मृत्यू, तर दुसरा...
20
Astro Tips: बायपाससारख्या मोठ्या शस्त्रक्रीया होण्यामागे कारणीभूत असते 'ही' ग्रहस्थिती!

नाशिकच्या तब्बल ५० हजार शेळ्या-मेंढ्यांचा थेट दुबईपर्यंत हवाई प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 21:39 IST

तब्बल पन्नास हजार शेळ्या-मेंढ्या नाशिक येथील विमानतळावरून थेट दुबईत पाठविल्या आहेत. त्यामुळे हा कुतुहलाचा विषय ठरला आहे. सलग दुसºया वर्षी त्यांनी हा यशस्वी प्रयोग केला आहे.

ठळक मुद्देनाशिकमधून ५० हजार शेळ्या-मेंढ्या दुबईलाओझर जवळ एच. ए. एल. आणि हॉल्कॉन यांच्या विद्यमाने कार्गो हब तयारपावसामुळे भारतातून समुद्रमार्गे होणारी वाहतूक बंद

नाशिक : विमानसेवेच्या माध्यमातून प्रवासी वाहतूक आणि माल वाहतूक करणे सर्वश्रुत आहे. मात्र नाशिकच्या एका उद्योजकाने तब्बल पन्नास हजार शेळ्या-मेंढ्या नाशिक येथील विमानतळावरून थेट दुबईत पाठविल्या आहेत. त्यामुळे हा कुतुहलाचा विषय ठरला आहे. सलग दुसºया वर्षी त्यांनी हा यशस्वी प्रयोग केला आहे.सामान्यत: विमानतळ हे प्रवासी वाहतुकीसाठी असते. कार्गो सेवेत जीवित प्राणी नेण्याचा प्रकार सहसा नसतोच, परंतु नाशिकच्या कार्गो सेवेतून मात्र प्रथमच शेळ्या व मेंढ्या पाठविण्यात आल्या. नाशिकच्या सानप अ‍ॅग्रो कंपनीचे जयंत सानप आणि हेमंत सानप या दोघा बंधूंनी हा प्रयोग केला. नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील सानप बंधू तसे सधन कुटुंबातील आहेत. शेती हा त्यांचा मुख्य व्यवसाय फळे आणि भाजीपाल्याची ते निर्यातही करतात. मात्र, दुबईत व्यवसायासाठी गेल्यानंतर तेथे शेळ्या, मेंढ्यांची वाढलेली मागणी आणि नेमके त्याचवेळी पावसामुळे भारतातून समुद्रमार्गे होणारी वाहतूक बंद होत असल्याने गेल्या वर्षी प्रथमच हवाईमार्गे जिवंत शेळ्या व मेंढ्या पाठविण्याचे त्यांनी ठरविले. त्यासाठी त्यांनी सजिद लॉजिस्टीक या कंपनीची मदत घेतली. भारतीय विमानपत्तन प्राधीकरण आणि अन्य परवानग्या मिळवण्यासाठी मोठे परिश्रम घेतले. नाशिकमध्ये ओझर जवळ एच. ए. एल. आणि हॉल्कॉन यांच्या विद्यमाने कार्गो हब तयार करण्यात आला आहे. मात्र, त्याचा वापर होत नसला तरी सानप बंधूंनी त्याचा वापर करण्याचे ठरविले. या कामासाठी दुबईतून मालवाहतूक करणारे विमान भाड्याने घेण्यात आले आणि गेल्यावर्षी प्रथमच विमानातून जिवंत शेळ्या, मेंढ्यांची वाहतूक करून त्यांना दुबईत पोहोचवण्याचे काम सानप बंधूंनी केले. समुद्रमार्गे म्हणजे जहाजातून जनावरे नेताना त्यांचे मृत्यूचे प्रमाण अधिक असते. शिवाय पाच ते सहा दिवसांनी जनावरे पोहोचत असतात. येथे मात्र विमानसेवेमुळे अवघ्या चार तासांत दुबई गाठणे शक्य होत असते. शिवाय एकही शेळी किंवा मेंढी दगावत नसल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी पुरेशी तयारी करूनही केवळ ५० हजार शेळ्या व मेंढ्यांची वाहतूक करता आल्याचे हेमंत सानप यांनी सांगितले. नाशिकच्या विमानतळावर अपेक्षित उंचीचे हायलोडर नसल्याने विमानही मर्यादित उंचीचेच यंदा आणावे लागले. त्यामुळे ३४ फेºया करूनही केवळ ५० हजार शेळ्या, मेंढ्यांची निर्यात करता आली. हाय लोडर आणि अन्य अडचणी दूूर झाल्यास वर्षभर ही सेवा सुरूच ठेवण्याचा मानस असल्याचे सानप यांचे म्हणणे आहे.