मुंबई : एअर इंडियाने ‘कनेक्ट इंडिया’ कार्यक्रमांतर्गत भोपाळ-जबलपूर-हैदराबाद आणि भोपाळ-रायपूर-पुणे या दोन विमानसेवा २३ मेपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. आयटी, औद्योगिक आणि सुरक्षा क्षेत्रातील विद्यार्थ्यांकडून या मार्गावर विमानसेवा सुरू करण्यासंबंधी वारंवार मागणी होत होती. या मागणीची दखल घेत या दोन सेवा नव्याने सुरू करण्यात येणार आहेत.एआय-९८६५-भोपाळ-रायपूर-पुणे हे विमान भोपाळमधून सकाळी ८.४५ वाजता उड्डाण घेईल. रायपूरमध्ये १०.१५ वाजता पोचेल व पुणे येथे १ वाजता पोचेल. परतीच्या प्रवासासाठी एआय-९८६६ हे विमान पुणे येथून १.३० वाजता उड्डाण घेईल. रायपूर ३.४५ वाजता पोहोचेल, तर भोपाळ येथे ४.४५ वाजता पोचेल. हे सेवा सोमवार, बुधवार आणि शुक्रवार या दिवशी चालवण्यात येईल.भोपाळ-जबलपूर-हैदराबाद ही विमानसेवा आठवड्यातून चार दिवस चालवण्यात येईल. हे विमान सकाळी ८.४५ वाजता भोपाळ येथून उड्डाण घेईल. १२.२० वाजता हैदराबाद येथे पोचेल. त्याचप्रमाणे हैदरबादमधून १२.५० वाजता उड्डाण घेऊन भोपाळ येथे ६.२५ वाजता पोचेल.
एअर इंडियाची भोपाळ-पुणे सेवा
By admin | Updated: May 12, 2016 03:03 IST