शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

एअर इंडिया, मुंबई एफसी लढत बरोबरीत

By admin | Updated: May 11, 2017 02:39 IST

रोमांचक झालेल्या सामन्यात १९ वर्षांखालील एअर इंडिया संघाने उत्कृष्ट सांघिक खेळ करताना, एमडीएफए सुपर डिव्हिजनच्या प्ले आॅफ सामन्यात

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : रोमांचक झालेल्या सामन्यात १९ वर्षांखालील एअर इंडिया संघाने उत्कृष्ट सांघिक खेळ करताना, एमडीएफए सुपर डिव्हिजनच्या प्ले आॅफ सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी मुंबई एफसी ‘ब’ संघाला १-१ असे बरोबरीत रोखले. दुसरीकडे, मुंबई स्ट्रायकर्स संघाने बँक आॅफ इंडियाचा २-१ असा पराभव करून विजयी आगेकूच केली. मुंबई जिल्हा फुटबॉल संघटनेच्या (एमडीएफए) मान्यतेने अंधेरी क्रीडा संकुल स्टेडियममध्ये झालेल्या या सामन्यात एअर इंडिया व मुंबई एफसी यांनी तोडीस तोड खेळ ंकरत सामना चांगलाच चुरशीचा केला. सुरुवातीला दोन्ही संघांनी सावध खेळ केल्याने रंगत कमी झाली होती. परंतु १३व्या मिनिटाला राकेश करमारणने गोल करून मुंबई एफसीला १-० अशी आघाडी मिळवून दिली. या वेळी मुंबई एफसीने मध्यंतरापर्यंत हीच आघाडी कायम राखत नियंत्रण राखले. दुसऱ्या सत्रातही मुंबई एफसीने एअर इंडियाला फारशी संधी दिली नाही. अतिरिक्त वेळेत मात्र, एअर इंडियाने आक्रमक पवित्रा घेत सामन्यात जबरदस्त रंग भरले. अतिरिक्त वेळेच्या सातव्या मिनिटाला आशिष लालगे याने निर्णायक गोल करून एअर इंडियाला बरोबरी साधून दिली. तसेच, कुपरेज स्टेडियमवर अरनॉल्ड मस्कारेन्हस, अर्सलन हमदुले यांच्या जोरावर मुंबई स्ट्रायकर्सने आक्रमक खेळ करताना बँक आॅफ इंडियाला २-१ असे नमवले.