शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

पूर्व द्रुतगती मार्गावर आॅइल टँकर पेटला

By admin | Updated: August 6, 2015 01:43 IST

गोदीतून डिझेल भरून ठाण्याच्या दिशेने निघालेल्या डिझेल टँकरचा पूर्व द्रुतगती मार्गावर मुलुंडनजीक अपघात झाला. यामध्ये चालक अमरनाथ यादव

मुंबई: गोदीतून डिझेल भरून ठाण्याच्या दिशेने निघालेल्या डिझेल टँकरचा पूर्व द्रुतगती मार्गावर मुलुंडनजीक अपघात झाला. यामध्ये चालक अमरनाथ यादव (४५) आणि क्लीनर अमरनाथ सरोज (३५) हे दोघेही जळून खाक झाले. शवविच्छेदनासाठी त्यांचा मृतदेह राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. या अपघातामुळे ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहतुकीची कोंडी होऊन वाहनांची रांग लागली होती.पवई येथील रहिवासी असलेला यादव घाटकोपर येथील लिबर्टी कंपनीमध्ये चालक म्हणून काम करीत होता. बुधवारी गोदीतून भरलेले डिझेल रिफाइन करण्यासाठी शहापूर येथे जाण्यास तो निघाला होता. वेगावर नियंत्रण न राहिल्याने त्याचा टँकरवरचा ताबा सुटल्याने गाडी दुभाजकाला धडकली. अपघातातून कसेबसे सावरणार तोच टँकरने पेट घेतला. घटनेची माहिती मिळताच नवघर पोलिसांसह अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण आणण्यास सुरुवात केली. आगीवर नियंत्रण आणले तरीही रस्त्यावर पसरलेल्या डिझेलमुळे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला. काही वेळेसाठी वाहतूक थांबवून दुसऱ्या मार्गाने वळविण्याचाही प्रयत्न केला. या प्रकरणी नवघर पोलीस ठाण्यात एडीआर दाखल करून अधिक तपास सुरू केला आहे. (प्रतिनिधी)