शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिलीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकसमोर टीम इंडियाचा डंका!
4
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
5
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
6
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
7
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
8
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
9
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
10
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
11
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
12
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
13
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
14
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
15
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
16
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
17
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
18
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
19
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
20
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
Daily Top 2Weekly Top 5

एआयबी बॉलिवूड कलाकारांना भोवणार

By admin | Updated: February 13, 2015 01:37 IST

मुंबईत वरळी येथील वल्लभभाई पटेल स्टेडियममध्ये गेल्या महिन्यात आयोजित केल्या गेलेल्या आणि नंतर यू ट्यूबवरून जगभर प्रसारित करण्यात

मुंबई : मुंबईत वरळी येथील वल्लभभाई पटेल स्टेडियममध्ये गेल्या महिन्यात आयोजित केल्या गेलेल्या आणि नंतर यू ट्यूबवरून जगभर प्रसारित करण्यात आलेल्या ‘एआयबी’ या अश्लील कार्यक्रमाबद्दल स्टेडियमचे मालक असलेल्या नॅशनल स्पोर्ट््स क्लबच्या पदाधिकाऱ्यांसह बॉलिवूडच्या अनेक आघाडीच्या कलाकारांवर गुन्हा नोंदवून तपास करण्याचा आदेश महानगर दंडाधिकारी न्यायालयाने गुरुवारी दिला.गेल्या २० जानेवारी रोजी हा कार्यक्रम झाला होता. सामाजिक कार्यकर्ते संतोष दौडकर यांनी दाखल केलेल्या खासगी फौजदारी फिर्यादीवर अतिरिक्त महानगर दंडाधिकारी सी. एस. बाविस्कर यांनी ताडदेव पोलिसांना गुन्हा नोंदवून तपास करण्याचा व त्याचा अहवाल सादर करण्याचा आदेश दिला. याधी दौंडकर यांनी ताडदेव पोलिसांकडे लेखी फिर्याद दिली होती. परंतु त्यात दखलपात्र गुन्हा घडल्याचे स्पष्ट दिसत असूनही त्यांनी त्याची दखल न घेतल्याने अ‍ॅड. आभा सिंग यांच्यामार्फत दंडाधिकाऱ्यांकडे फिर्याद दाखल केली गेली होती.यानुसार आता ज्यांच्यावर गुन्हा नोंदविला जाईल त्यांत नॅशनल स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष जयंतीलाल शहा, क्लबचे सरचिटणीस रवींदर अगरवाल, ‘एआयबी’ कार्यक्रमाचे आयोजक यांच्यासह करण जोहर, रणवीर सिंग रोहन जोशी, तन्मय भट, गुरसिमरन खंबा, आशिश शाक्य, आदिती मित्तल, दीपिका पडुकोण, आलिया भट, राजीव मसंद आणि अर्जून कपूर यांचा समावेश आहे.फिर्यादीनुसार संगनमत व कारस्थान करून जाहीरपणे अश्लील कार्यक्रम आयोजित करणे (भादंवि कलम १२० बी व ३४), जाहिर कार्यक्रमात महिला लज्जीत होतील अशी वक्तव्ये करमे (कलम २९४ व ५०९) पोलिस परवानगीचे उल्लंघन करून जाहीर अश्लील कार्यक्रम करणे ( मुंबई पोलीस कायदा कलम ३३, १३१ व ११०), ‘सीआरझेड’ क्षेत्रात सक्षम प्राधिकाऱ्यांची परवानगी न घेता इच्छित उद्देशाहून अन्य कार्य क्रमासाठी जागेचा वापर करणे (पर्यावरण रक्षण कायदा कलम १५) आणि सार्वजनिक जागेचा इच्छिथ कारणाखेरीज अन्य कारणासाठी वापर करणे (नगररचना कायदा कलम ५२) हे गुन्हे नोंदविले जातील. ते सिद्ध झाल्यास आरोपींना सहा महिन्यांपासून २० वर्षांपर्यंतच्या कारावासाची शिक्षा होऊ शकेल, असे अ‍ॅड. आभा सिंग यांनी सांगितले. (विशेष प्रतिनिधी)