शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

कृषी योजना राबविण्यात अहमदनगर सरस; नाशिक जिल्हा राज्यात दुसरा तर सोलापूर तिसरा

By appasaheb.patil | Updated: July 16, 2022 10:09 IST

शेतकऱ्यांसाठी कृषी यांञिकीकरण योजनेतुन संरक्षित शेती, कांदाचाळ, शेततळे अस्तरीकरण, ट्रॅक्टर, ट्रॅक्टर औजारे, पाईपलाईन, स्प्रे पंप व इतर योजनांसाठी हा खर्च करण्यात आला आहे.

सोलापूर: कृषी खात्याच्या योजना प्रभावीपणे राबवून निधी खर्च करण्यात सोलापूर जिल्हा राज्यात तिसरा तर अहमदनगर प्रथम तर नाशिक जिल्हा राज्यात दुसर्या क्रमांकावर आहेत. अहमदनगर जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाचा १३८ कोटी ८४ लाख ९४ हजार ३७४ रुपये इतका निधी विविध योजनासाठी खर्च झाला आहे.

मागील वर्षभरात कोरोणा'चा कालावधी असतानाही शेती आणी शेतकर्यांसाठी योजना राबविल्यानेच सर्वाधिक निधी खर्च करुन अहमदनगर, नाशिक व सोलापूर जिल्हे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकावर आहेत. अहमदनगर जिल्ह्यात सर्वाधीक १३८ कोटी ८४ लाख ९४ हजार ३७४ रुपये इतका निधी खर्च केला आहे. त्या नंतर नाशिक जिल्ह्यात १०७ कोटी ३७ लाख ३२ हजार ४९२ रुपये तर १०३ कोटी ८६ लाख ३३ हजार ३३० रुपये सोलापूर जिल्ह्याने खर्च केला आहे.कृषी यांत्रिकीकरण योजना

शेतकऱ्यांसाठी कृषी यांञिकीकरण योजनेतुन संरक्षित शेती, कांदाचाळ, शेततळे अस्तरीकरण, ट्रॅक्टर, ट्रॅक्टर औजारे, पाईपलाईन, स्प्रे पंप व इतर योजनांसाठी हा खर्च करण्यात आला आहे. ९० कोटी २६ लाख खर्च करुन बुलढाणा जिल्हा राज्यात चौथा, ७८ कोटी ७७ लाख खर्च करुन जळगाव पाचव्या क्रमांकावर आहे.  ६४ कोटी २५ लाख रुपये खर्च  करणारा पुणे जिल्हा ६ व्या, ६० कोटी ३० लाख खर्च करणारा औरंगाबाद जिल्हा सातवा, ५४ कोटी १२ लाख खर्च करुन सांगली जिल्हा ७ वा तर उस्मानाबाद जिल्हाने ५१ कोटी ८२ लाख रुपये विविध योजनांसाठी खर्च करुन राज्यात आठव्या क्रमांकावर आहे. राज्यातील इतर जिल्हाने ४ ते ५० कोटी पर्यंत खर्च केला आहे. लॉटरीतून लाभार्थी निवड...

- विविध योजनांसाठी लाॅटरीत निवड झालेल्या २३ लाख ४ हजार ६८२ इतक्या लाभार्थ्यांपैकी तपासणीत १२ लाख ११ हजार ६१९ प्रस्ताव रद्द झाले. निवड झालेल्यांपैकी ६५ हजार ७५२ लाभार्थ्यांची नावे पुन्हा रद्द करण्यात आली.- पाञ १० लाख २७ हजार ३११ लाभार्थ्यांपैकी ६ लाख २६  हजार लाभार्थ्यांनी कागदपञ सादर केली. खरेदी करण्यास परवानगी दिलेल्यापैकी ४ लाख ५२ हजार ४६० शेतकर्यांनी वस्तु  खरेदी केल्याने एकुण १४३७ कोटी ३७ लाख ८९ हजार ६७२ रुपये खर्च झाला आहे.

टॅग्स :agricultureशेती