शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

संग्रामपूर येथील अँग्रो सेंटरचा किटकनाशक विक्री परवाना रद्द !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2016 00:41 IST

प्रभाव लोकमतचा; मुदतबाह्य किटकनाशक विक्री करणे भोवले.

संग्रामपूर (जि. बुलडाणा), दि. 0९ : गिरीश अँग्रो सेंटर या कृषी केंद्र चालकाने शेतकर्‍याला मुदतबाह्य किटकनाशक विक्री केल्याने सिद्ध झाल्यानंतर जिल्हा कृषी विकास अधिकारी यांनी दुकानाचा किटकनाशक विक्रीचा परवाना ८ ऑगस्ट रोजी रद्द केला आहे.निरोड येथील शेतकरी गजानन संगीतराव अवचार यांनी कपाशी पिकावर तुडतुडे व मावा या रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने फवारणीकरिता गिरीश अँग्रो सेंटरमधून ९ जुलै रोजी रॅलिज टाटा मिडा या नामांकित कंपनीचे १00 मिलीचे किटकनाशक खरेदी केले होते. लॉट नंबर एसए ४00१५ असलेल्या या किटकनाशकावर उत्पादनाची तारीख २ जून २0१४ असून १ जून २0१६ ही तारीख किटकनाशकाची मुदत संपणार असल्याबाबत उत्पादनावर दर्शविण्यात आली होती. अवचार यांनी किटकनाशक खरेदी केले तेव्हा त्यांच्या ही बाब लक्षात आली नाही. ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी २ ऑगस्ट रोजी गिरीश अँग्रो या कृषी केंद्रचालकाविरुध्द पंचायत समिती कृषी अधिकारी कार्यालयाकडे तक्रार केली होती. कृषी अधिकारी उंद्रे यांनी या प्रकरणाची ३ ऑगस्ट रोजी चौकशी केली असता या चौकशीमध्ये कृषी केंद्रचालक सतीष राठी याने संबंधित शेतकर्‍यास मुदतबाह्य किटकनाशक विक्री केल्याचे सिध्द झाले होते.या चौकशीचा अहवाल जिल्हा कृषी विकास अधिकारी भराड यांना पाठविण्यात आला होता. या चौकशी अहवालावरुन जिल्हा कृषी विकास अधिकारी भराड यांनी गिरीश अँग्रो सेंटरचा किटकनाशक विक्रीचा परवाना ८ ऑगस्ट रोजी रद्द केला आहे. शेतकर्‍यांची अशाप्रकारे फसवणूक होवू नये यासाठी सदर प्रकरणाबाबत ह्यलोकमतह्णने वृत्ताच्या माध्यमातून पाठपुरावा केला होता.

--सतिष राठी व पंचायत कृषी अधिकारी यांच्या सक्षम घेण्यात आलेल्या समक्ष सुनावणीत गिरीश अँग्रो सेंटरचा किटकनाशक विक्रीचा परवाना रद्द करण्यात आला आहे.- रमेश भराडजिल्हा कृषी विकास अधिकारी बुलडाणा