शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
6
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
7
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
8
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
9
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
10
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
11
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
12
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
13
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
14
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
15
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
16
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
17
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
18
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
19
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
20
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

कृषी विद्यापीठाच्या प्राध्यापकांचे निवृत्ती वृत्ती वय ६२ वर्षे!

By admin | Updated: February 27, 2015 00:27 IST

कुलगुरूंच्या नवृत्तीचे वय ७0 केव्हा करणार, आयसीएआरचा मॉडेल अँक्ट शासनाने गुंडाळला.

अकोला: राज्यातील चारही कृषी विद्यापीठ आणि नागपूर येथील महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या प्राध्यापक, शास्त्रज्ञांचे नवृत्तीवय ६२ वर्ष करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शासनाने घेतला आहे. कृषी विद्यापीठातील ५0 टक्केपेक्षा जास्त रिक्त असलेल्या पदावर तोडगा म्हणून शासनाने या निर्णयाला बुधवारी मंजुरात दिली आहे. या प्रमाणेच भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या मॉडेल अँक्टनुसार कृषी विद्यापीठांच्या कुलगुरू ंचे नवृत्तीचे वय ७0 वर्ष करणे क्रमप्राप्त असताना मॉडेल अँक्ट मात्र शासनाने गुंडाळला आहे. राज्यातील चारही कृषी विद्यापीठातील प्राध्यापकांसह अनेक महत्त्वाची पदे रिक्त आहेत. विद्यापीठांच्या स्थापनेपासून त्याकडे सातत्याने दुर्लक्ष होत गेल्याने प्राध्यापक, शास्त्रज्ञांचा ५0 टक्केपेक्षा अधिक अनुशेष या विद्यापीठांमध्ये निर्माण झाला आहे. त्याचे परिणाम मात्र कृषी विद्यापीठांच्या शिक्षण, संशोधन आणि विस्तार कार्यावर होत आहे. या पृष्ठभूमीवर भारतीय कृषी संशोधन परिषदेने (आयसीएआर) कृषी विद्यापीठाच्या प्राध्यापकांचे नवृत्तीवय ६२ करण्यासंदर्भात राज्य शासनाला कळवले होते. यासंबंधीचा निर्णय पंधरा दिवसांपूर्वी महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेने शासनाकडे पाठवला होता. शासनाने बुधवार, २५ फेब्रुवारी रोजी या निर्णयावर शिक्कामोर्तब केले असून, २४ फेब्रुवारी २0१५ पासून राज्यातील चारही कृषी विद्यापीठांना हा निर्णय लागू झाला आहे.आयसीएआरने देशातील कृषी विद्यापीठांसाठी मॉडेल अँक्ट लागू केला आहे. या अँक्टनुसार देशातील सर्व कृषी विद्यापीठांची कार्यपद्धती सारखी असावी, यासाठीची तरतूद केली आहे. या अँक्टनुसार कृषी विद्यापीठांच्या कुलगुरूं चे नवृत्तीचे वय ७0 वर्ष असावे, यासाठी आयसीएआरने राज्यशासनाला पत्र दिलेले आहे. कृषी विद्यापीठांना स्वायत्ता देण्यासंबंधीची या मॉडेल अँक्टमध्ये तरतूद आहे. देशातील इतर राज्यात कुलगुरूं ची सेवानवृत्तीची वयोर्मयादा ७0 करण्यात आली आहे. महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेने शासनला शिफारस केली आहे. पण राज्यशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याचे चित्र आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कुलगुरू ंचा कार्यकाळ संपला आहे. पण अनुभव आणि कृषी विद्यापीठांचा विविध पदावर काम केलेली योग्य व्यक्ती मिळत नसल्याने या विद्यापीठाला कुलगुरू मिळणे कठीण झाले आहे. या पृष्ठभूमीवर या राज्यातील कृषी विद्यापीठांचे कुलगुरू लवकरच राज्यपाल, मुख्यमंत्री, कृषिमंत्र्यांना भेटणार आहेत.महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ तुकाराम मोरे यांनी कृषी विद्यापीठांच्या प्राध्यापकांचे नवृत्तीवय ६२ वर्ष केले आहे. अत्यंत चांगला निर्णय झाला असल्याचे सांगीतले. तसेच कुलगुरूचे नवृत्तीवय ७0 वर्ष करण्याची गरजही व्यक्त केली.