शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
2
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
3
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
4
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
5
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
6
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
7
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
8
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
9
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
10
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
11
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
12
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
13
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
14
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
15
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला कोणत्या उपासनेने होते शीघ्र लक्ष्मीकृपा? वाचा 'हे' प्रभावी स्तोत्र
16
Pakistan: खेळणं समजून शाळेत नेला बॉम्ब, वर्गात जाताच मोठा स्फोट; अनेक विद्यार्थी जखमी
17
Kojagiri Purnima 2025: शास्त्रानुसार कोजागरीच्या रात्री जागरण आणि पूजा केल्याने होते लक्ष्मीकृपा; वाचा व्रतविधी!
18
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
19
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा
20
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले

कृषी समृद्धी ८५ गावांत

By admin | Updated: June 7, 2017 03:57 IST

शेतीची प्रती हेक्टरी उत्पादकता वाढविण्यासाठी उन्नत कृषी समृद्ध शेतकरी अभियान शासनाने हाती घेतले

अनिरुद्ध पाटील । लोकमत न्यूज नेटवर्कबोर्डी : शेतीची प्रती हेक्टरी उत्पादकता वाढविण्यासाठी उन्नत कृषी समृद्ध शेतकरी अभियान शासनाने हाती घेतले असून ते तालुका कृषी विभागातर्फे १ मे ते १५ मे आणि २४ मे ते ८ जून अशा दोन टप्यात राबविले जाणार आहे. डहाणू तालुक्यातील खरीप हंगामाचे भात क्षेत्र १५ हजार हेक्टर असून हळवे २५४५ हे., निमगरवे ९९०६ हे. आणि गरवे २५४० हे. इतके आहे. तालुक्याचे सरासरी पर्जन्यमान १९१० मिमी असून डोंगरी आणि सागरी भागात भाताचे उत्पादन घेतले जाते. डहाणू पंचायत समिती कृषी विभागामार्फत ५० टक्के अनुदानावर कर्जत ३ या हळव्या भाताच्या बियाणाचे वितरण करण्यात येत असल्याची माहिती कृषी अधिकारी ए. बी. जैन यांनी दिली.या योजनेचा फायदा ८५ ग्रामपंचायतीतील १७४ गावांमधील प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत पोहचण्याचे उद्दीष्ट आहे. डहाणू, कासा आणि वाणगाव या तीन मंडळाचे अधिकारी, ६ सुपरवायझर व २८ कृषी सहाय्यकांच्या मदतीने प्रत्यक्ष कामाला प्रारंभ केल्याची माहिती कृषी अधिकारी आर. यू. ईभाड यांनी दिली. शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून भाताची अनुवांशिक उत्पादन क्षमता वाढवून उत्पादन वाढविणे, प्रधानमंत्री पीक विमा योजनेत अधिकाधिक शेतकऱ्यांचा समावेश करणे आणि शेतीला तंत्रज्ञानाची जोड देऊन यंत्राचा जास्तीत-जास्त अवलंब करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रवृत्त करणे या स्वरूपात ही योजना राबविली जाईल. शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे उपलब्ध व्हावे, या करिता विशेष मोहीम राबवली जाणे आवश्यक असून बियाणे, खते आणि कीटकनाशकांचा काळाबाजार रोखण्यासाठी कृषी विभागामार्फत तालुक्यात भरारी पथकाची नियुक्ती करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. >भाताच्या गुजरात वाणाला महाराष्ट्रात बंदी का ?शासनाच्या कृषी विभागामार्फत केवळ एकाच जातीचे भात बियाणे पुरविले जात आहे. येथील जमितीन गुजरात या भात वाणापासून दर्जेदार पीक मिळत असून सरासरी उत्पादन चांगले येत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. गुजरात ४ (हळवे) आणि ११ (गरवे) दोन प्रकारात ते उपलब्ध असून कोलम या भाताशी साम्य आहे. त्यामुळे मागणी मोठ्या प्रमाणात आहे. परंतु या वाणाला महाराष्ट्रात विक्रीकरिता बंदी आहे. त्यामुळे त्याच्या खरेदीसाठी गुजरातमध्ये जावे लागत आहे. शासनाकडून लादलेल्या बंदीचे कारण अद्याप समजलेले नाही तथापि शेतकऱ्यांच्या हिताकरिता ही बंदी तत्काळ हटविण्याची मागणी करण्यात येत आहे. यंदाच्या खरीप हंगामात उन्नत कृषी समृद्ध शेतकरी अभियान राबविण्यात येत आहे. त्या अंतर्गत कृषी सहाय्यकांच्या माध्यमातून जनजागृती करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जात आहे. कृषी उत्पादन वाढविणे हा त्या मागचा उद्देश आहे.- आर. यू. इभाड, तालुका कृषी अधिकारी, डहाणूया विभागात भाताच्या खरीप हंगामासाठी १५० क्विंटल भात वाणांचा पुरवठा झाला आहे. ७/१२ च्या उताऱ्याची प्रत जमा करून १० किलोसाठी १७० रु पये आकारणी केली जाते. या योजनेचा अधिकाधिक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा.- ए. बी. जैन, कृषी अधिकारी, डहाणू पंचायत समिती