शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

बोगस बियाणे विकणाऱ्या कंपनीकडून कृषी अधिकाऱ्याला धमकी

By admin | Updated: July 11, 2016 21:06 IST

शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या एका बियाणे उत्पादक कंपनीच्या आॅर्गनायझरने थेट कृषी अधिकाऱ्यांनाच धमक्या देणे सुरू केल्याची धक्कादायक माहिती पुढे आली

ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. 11-  आतापर्यंत बोगस बियाण्याची विक्री करून शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या एका बियाणे उत्पादक कंपनीच्या आॅर्गनायझरने थेट कृषी अधिकाऱ्यांनाच धमक्या देणे सुरू केल्याची धक्कादायक माहिती पुढे आली. भंडारा येथील जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक सुप्रिया कावळे असे त्या महिला कृषी अधिकाऱ्यांचे नाव आहे. यासंबंधी कावळे यांनी सोमवारी नागपुरातील विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाकडे लेखी तक्रार केली आहे. त्यानुसार हिंगणघाट येथील मे. यशोदा हायब्रीड सीडस् कंपनीचे आॅर्गनायझर आनंद तळेकर रा. मांगली, ता. पवनी असे त्या धमकी देणाऱ्या आॅर्गनायझरचे नाव आहे. कावळे यांच्या मते, त्या मागील २४ जून २०१६ रोजी बियाणे तक्रारीच्या चौकशीसाठी आनंद तळेकर यांच्याकडे गेल्या होत्या. दरम्यान, तळेकर यांनी आपण हिंगणघाट येथील यशोदा सीडस् कंपनीचा आॅर्गनायझर असून, कंपनीसाठी सीडस् प्रोग्राम राबवीत असल्याचे सांगितले. त्यावर कावळे यांनी सीडस् प्रॉडक्शन प्रोग्रामबद्दल सविस्तर माहिती लिहून घेतली. यानंतर ९ जुलै २०१६ रोजी कावळे यांना एका मोबाईलवरून फोन आला. समोरच्या व्यक्तीने आपण आनंद तळेकर बोलत असल्याचे सांगितले. शिवाय तुम्ही जर माझे जीवन खराब केले, तर मी सुद्धा तुमचे जीवन खराब करून टाकीन. मी तुमच्याबद्दल सगळी माहिती काढली आहे. तुम्ही कसे काम करता, ते मी पाहतो. मी तुम्हाला जगू देणार नाही. तुम्ही कुणाच्या पत्नी आहात, ही सुद्धा मी माहिती काढली आहे. मला तुम्ही लिहून नेलेल्या माहितीची ओसी द्या, अशा शब्दात तळेकर यांनी थेट कावळे यांना धमकी दिली आहे. या संपूर्ण प्रकरणाची विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाने गंभीर दखल घेऊन, लगेच पुणे येथील कृषी आयुक्तालयातील कृषी संचालक (नि. व गु. नि.) यांना माहिती कळवून मे. यशोदा सीडस् कंपनीविरुद्ध योग्य ती कार्यवाही करण्याची विनंती केली आहे. त्याचवेळी या धमकीने संपूर्ण कृषी विभागात खळबळ माजली आहे.