शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शेती, उद्योग, पाण्याच्या दरात वाढ : घरगुती दरवाढीचा निर्णय पालिकांच्या हाती; जलसंपदा प्राधिकरणाचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2018 05:00 IST

शेती, उद्योग आणि घरगुती वापरासाठी जलसंपदा विभागातर्फे पुरविण्यात येणाºया पाण्याचे दर १ फेब्रुवारीपासून वाढविण्याचा निर्णय महाराष्ट्र जलसंपदा प्राधिकरणाने शुक्रवारी घेतला

मुंबई : शेती, उद्योग आणि घरगुती वापरासाठी जलसंपदा विभागातर्फे पुरविण्यात येणाºया पाण्याचे दर १ फेब्रुवारीपासून वाढविण्याचा निर्णय महाराष्ट्र जलसंपदा प्राधिकरणाने शुक्रवारी घेतला. घरगुती पाणी दरवाढीचा बोजा थेट ग्राहकांवर टाकायचा की नाही, याचा अधिकार स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्यात आला आहे.प्राधिकरणाचे अध्यक्ष के.पी.बक्षी आणि सदस्य व्ही.एम.कुलकर्णी यांनी दरवाढीची घोषणा केली. क्षमतेपेक्षा ११५ टक्के ते १४० टक्के जास्त पाणी वापरावर मानक दराच्या १.५० पट दर आकारला जाईल. पाणीवापर संस्थांची स्थापना करुन शेतकºयांनी पाणी घेतले तर प्रोत्साहन म्हणून पाणी दरात २५ टक्के सूट दिली जाईल. तसेच, सूक्ष्म सिंचनाचा वापर केल्यास २५ टक्के वेगळी सूट दिली जाईल.ग्राम पंचायतींसाठी माणशी ४० लिटर मर्यादा ५५ लिटर केली आहे. क वर्ग पालिकांसाठी ही मर्यादा माणशी ७० लिटर, ब वर्ग पालिकांसाठी १०० लिटर, अ वर्ग पालिकांसाठी १२५ लिटर, ५० लाखांपेक्षा कमी लोकसंख्येच्या महापालिकांसाठी १३५ लिटर तर मुंबई महापालिकेसाठी १५० लिटर इतकी असेल.मिनरल वॉटर, बीअरही महागणारमिनरल वॉटर, शीतपेये आणि बीअर उत्पादक कारखान्यांना पुरविण्यात येणाºया पाण्याच्या दरात मोठी वाढ करण्यात आली आहे. आधी त्यांच्याकडून एक हजार लिटरमागे १६ रुपये आकारले जात असत. आता १२० रुपये आकारले जाणार आहेत.