शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी दबावाखाली काम करत नाही'; जगदीप धनखड यांनी असे का म्हटले?, राजीनाम्यानंतर व्हिडीओ व्हायरल
2
जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याचं टायमिंग अनेकांना न पटण्यासारखे; 'त्या' ३ तासांत काय घडले?
3
राजनाथ सिंह यांच्याकडे राजकीय हालचालींना वेग; भाजपा खासदाराच्या कोऱ्या कागदावर का घेतल्या सह्या?
4
एकदा- दोनदा नाही, एअर इंडियाला सहा महिन्यात ९ कारणे दाखवा नोटीस बजावल्या; सरकारची माहिती
5
४ मुलांच्या आईनं २४ वर्षाच्या युवकाशी केलं कोर्ट मॅरेज; पतीनं सोडला सुटकेचा नि:श्वास, म्हणाला...
6
२ शत्रू ग्रहांची युती: ९ राशींचे कल्याण, दुपटीने लाभ; पद-पैसा वृद्धी, राजयोगांचा वरदान काळ!
7
जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा; प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय
8
आजचे राशीभविष्य, २२ जुलै २०२५: 'या' २ राशींसाठी लाभदायी दिवस, अचानक धनलाभ होईल
9
'आम्ही अणुकार्यक्रम सुरूच ठेवणार', युरोपीय देशांशी चर्चेपूर्वी इराणचा अमेरिकेला संदेश
10
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
11
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
12
एअर इंडिया विमानाचे तीन टायर फुटले; विमानतळावर लँडिंगच्या वेळी पावसामुळे विमानाने धावपट्टी सोडली
13
मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंना सुनावले; जे काही घडले ते भूषणावह नाही!
14
मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपींच्या सुटकेसाठी उच्च न्यायालयाला का लागले तब्बल १० वर्षे?
15
ब्रिगिट मॅक्रॉन ‘पुरुष’? खटले आणि वादांना ऊत! दाव्याची सत्यता काय?
16
अंधेरी मेट्रो स्थानकात गळती; पाणी गोळा करण्यासाठी बादल्यांचा वापर
17
भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती
18
परिचारिकांच्या संपामुळे पाच दिवसांपासून रुग्णांचे हाल; नियमित शस्त्रक्रियाही पूर्णपणे बंद
19
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!
20
सोळावे वरीस... धोक्याचे नव्हे, निवडणुकीत मत देण्याचे! ब्रिटनचा धाडसी निर्णय; युवाशक्ती लोकशाहीत सहभागी!

विक्रमगडमध्ये शेतीची कामे जोरात

By admin | Updated: June 27, 2016 02:48 IST

विक्रमगड तालुक्यातील शेतीची मशागतीची कामे पूर्ण करुन शेतकरी नांगरणी व लगोलग पेरणीच्या कामाला लागला आहे.

विक्रमगड : जिल्हयात सर्वत्र पावसाची दमदार सुरुवात झालीआहे़ त्यानुसार विक्रमगड तालुक्यातील शेतीची मशागतीची कामे पूर्ण करुन शेतकरी नांगरणी व लगोलग पेरणीच्या कामाला लागला आहे. तालुक्यात आतपर्यंत सरासरी २६.५५ मि़मी़ पावसाची नोंद करण्यांत आल्याचे तहसिल कार्यालयाने सांगितले.तालुक्यात एकुण ८६ गावपाडयांत ७५५७ हेक्टर क्षेत्रामध्ये मोठया स्वरुपात भात पिक घेतले जाते़ त्यासाठी सुधारीत भात वाणांमध्ये अती हळव्या गटात कर्जत-१८४, रत्नागिरी-२४, हळव्या गटात रत्ना, रत्नागिरी-१, रत्नागिरी-७११,कर्जत-३,कर्जत-४,कर्जत-७,एमटीयू-१०१०,रत्नागिरी-५, निमगरवा गट जया, पालघर-१, कर्जत-५ एमटीयू-१००१, कर्जत-६,एच एम टी सोना, पुसा बासमती-१,इंद्रायणी, गरवा गट कर्जत-२,कर्जत-८,सुवर्णा(एमटीयू-७०२९), मसुरी, सांबा मसुरी(बीपीटी-५२०४),श्रीराम,संकरीत वाण पुसा आर एच-१०,संकरित मंगला,संकरित कल्याणी,संकरित सहयाद्री-२,संकरित सहयाद्री-४,संकरित सहयाद्री,संकरित सहयाद्री-३ याप्रमाणे सुधारीत भातांच्या बियाणांची आवक वाढली आहे़ पारंपारिक बियाणांचा वापर न करता मोठया प्रमाणात कंपन्यांनी तयार केलेल्या या भात बियाणांचा वापर होउ लागला आहे़ खताचीही मागणी वाढली आहे़ मान्सूनवर अवलंबून राहाणारा शेतकरी भात या एकाच पिकावर लक्ष केंद्रित करुन उत्पादन काढत असून या वर्षी पंचायत समिती कृषी विभागाने मागणी नुसार भात बियाणे वेळेत उपलब्ध करुन दिली जात आहेत. परंतु यंदाही भात बियाणे व खतांच्या किमतीही वाढल्याने शेती करणे शेतकऱ्यांना मोठे जिकिरीचे होत आहे़ >मोखाड्यातही संततधार सुरूमोखाडा : शनिवारी दुपारी सुरू झालेल्या पावसाने रात्रभर मोखाडा व सभोवतालच्या परिसरामध्ये संततधार चालू ठेवल्याने बळीराजा सुखावला आहे. आठवडाभर राज्यांच्या अनेक भागात ठाण मांडुन बसलेल्या वरु ण राजाने अखेर पालघर जिल्ह्यातील जव्हार, मोखाडा आदी तालुका भरात दमदार हजेरी लावली. दीड-दोन आठवड्याभरापूर्वी धुळीवर पेरणी केलेल्या नाचणी, वरई आदी पिकांना या पावसाने जीवनदान मिळालेले आहे.तसेच दिवसभरांच्या संततधारेमुळे शेतकऱ्याने भात, तूर, उडीद या पिकांच्या पेरणीच्या कामांना जोमाने सुरवात केली आहे.तर महिन्यातील चौथा शनिवार व रविवारी पाऊस सुरू असल्याने अनेकांनी पिकनिकचा आनंद घेतला. रविवार पासून बळीराजा पेरणीच्या कामात मग्न असल्याचे सर्वत्र दिसत होते. (वार्ताहर)