शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

दुर्गम भागात कृषी तंत्रज्ञान प्रसार !

By admin | Updated: January 30, 2016 02:17 IST

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा विदर्भात पीक व्यवस्थापनावर भर.

अकोला : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या विस्तार शिक्षण संचालनालयाच्यावतीने यावर्षी विदर्भातील अकरा जिल्हयात एकात्मिक पीक व्यवस्थापन तंत्रज्ञानाचा प्रसार प्रकल्प राबविण्यात येत असून, राष्ट्रीय कृषी विकास योजनेतंर्गत राबविण्यात येणार्‍या या प्रकल्पातंर्गत विविध पिकांच्या उत्पादन वाढीवर भर देण्यात येत आहे. दुर्गम भागातील शेतावर या प्रकल्पातंर्गत शेतकर्‍यांना पीक व्यवस्थापनाची माहिती देण्यात येत आहे. राष्ट्रीय कृषी विकास योजनेतंर्गत २0१५-१६ यावर्षी हा प्रकल्प राबविण्यासाठी अनुदान उपलब्ध करू न देण्यात आले असून, या योजनेतंर्गत विविध कृषीविषयक योजना सुरू करण्यात आल्या आहेत. कृषी विभागातंर्गत अनेक योजना सुरू करण्यात आल्या आहेत. शेतीपुढील आव्हाने बघता, शेतकर्‍यासाठींच्या योजनेवर अधिक भर देण्यात आला असून, कृषी विद्यापीठामार्फत पीक व्यवस्थापन तंत्रज्ञानाचा प्रसार करण्यावर भर देण्यात आला आहे. विदर्भातील ११ जिल्हयातील कृषी विद्यापीठाची कृषी विज्ञान केंद्र या योजनेत महत्वाची भूमिका बजावणार असून, या केंद्राअंतर्गत प्रत्यक्ष शेतावर कार्यक्रम राबविण्यात येत आहे. यासोबतच कृषी महाविद्यालय नागपूर, प्रादेशीक संशोधन केंद्र अमरावती तसेच कृषी विद्यापीठाच्या वाशिम येथील कृषी संशोधन केंद्रांचा समावेश करण्यात अला आहे. सध्या या ठिकाणी हा प्रकल्प राबविण्यास सुरू वात करण्यात आली आहे. महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद, पुणे व राज्य शासनाने या प्रकल्पाची आखणी केली असून, दुसर्‍या टप्प्यात तंत्रज्ञान प्रसार प्रकल्पावर अधिक भर देण्यात येत आहे. विदर्भातील शेतकर्‍यांनी तंतोतत शेती करू न,पीक उत्पादन वाढ करावी,यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा विस्तार शिक्षण विभाग जोमाने कामाला लागला आहे. या संचालनालयांतर्गत असलेल्या कृषी विज्ञान केंद्रांतर्गत हा कार्यक्रम दुर्गम भागात राबविण्यात येत आहे.