शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

कृषी प्रकल्पातील गैरव्यवहारांची चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2018 01:41 IST

लोकमत इम्पॅक्ट : उच्चस्तरीय समिती नियुक्त

गणेश देशमुख ।मुंबई : समन्वयित कृषी विकास प्रकल्पातील भ्रष्टाचाराबाबत ‘लोकमत’ने दिलेल्या वृत्ताची दखल घेत राज्य शासनाने दोषींविरुद्ध तत्काळ कारवाई करण्याचे आदेश शनिवारी दिले. विद्यमान प्रकल्प संचालक तथा अमरावतीच्या विभागीय महसूल आयुक्तांना हे आदेश दिले आहेत. याशिवाय पुण्याच्या पशुसंवर्धन आयुक्तांनीही या प्रकरणी स्वतंत्र उच्चस्तरीय चौकशी समिती नेमल्याने दोषींविरुद्ध चौकशीचे फास आवळू लागले आहेत.महाराष्ट्र शासनाच्या सहकार व पणन विभागाचे कार्यासन अधिकारी जयंत भोईर यांनी काढलेल्या या आदेशात ‘लोकमत’च्या वृत्तमालिकेचा उल्लेख करून ‘सोलास’ या संस्थेद्वारे घेण्यात आलेली प्रशिक्षणे, त्याअनुशंगाने झालेला खर्च, उर्वरित देयके अदा करण्याबाबतची वित्तीय प्रक्रिया आणि संस्था निवड प्रक्रियेत अनियमितता झाल्याचे नमूद केले आहे. या अनियमितेसाठी दोषी असलेल्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर तत्काळ जबाबदारी निश्चित करावी व त्याचा अहवाल शासनाला पाठवावा, असे कार्यासन अधिकाºयांनी नमूद केले आहे.पशुसंवर्धन आयुक्तांची तीन सदस्यीय समितीपशुसंवर्धन आयुक्त कांतीलाल उमप यांना भ्रष्टाचाराच्या याच प्रकरणात स्वतंत्र उच्चस्तरीय चौकशी समिती नेमली आहे. या तीन सदस्यीस समितीत पुण्यातील सहआयुक्त एस. बी. तटवर्ती, नाशिक येथील विभागीय सहआयु्क्त डी. डी. परकाळे आणि औरंगाबाद येथील सहायक आयुक्त वल्लभ जोशी यांचा समावेश आहे. तटवर्ती हे या चौकशी समितीचे प्रमुख असतील. ८ मेपर्यंत चौकशी अहवाल सादर करण्याचे बंधन समितीला घालण्यात आले आहे.पुण्याच्या औंधमधील रोगप्रतिबंधक विभागात पशुधन विकास अधिकारी या राजपत्रित पदावर कार्यरत असतानाही यशवंत वाघमारे यांनी समन्वयित कृषी विकास प्रकल्पांतर्गत सोलास या संस्थेच्या वतीने पशुधन व्यवस्थापन प्रशिक्षणे राबविली, असा अहवाल अमरावतीच्या विभागीय आयुक्तांनी शासनाला १९ रोजी पाठविला. प्रकल्पाचे कार्यक्षेत्र असलेल्या अमरावती, वर्धा, यवतमाळ, वाशिम, बुलडाणा आणि अकोला या सर्व सहा जिल्ह्यांच्या प्रकल्प कार्यालयांत त्यासंबंधीचे पुरावे उपलब्ध असल्याचेही विभागीय आयुक्तांनी अहवालात नमूद केले आहे. त्याअनुशंगाने ही समिती चौकशी करेल, असे पशुसंवर्धन आयुक्त कांतीलाल उमप यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र