शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

जुलैचा पहिला आठवडा कृषी जागृतीचा!

By admin | Updated: June 26, 2015 00:02 IST

शेतक-यांसह ग्रामपंचायतींचा घेतला जाणार सहभाग.

अकोला: शासनाच्या कृषी खात्यामार्फत १ ते ७ जुलै या कालावधीत राज्यात कृषी जागृती सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. गावागावात राबविण्यात येणार्‍या या कार्यक्रमात शेतकर्‍यांसह ग्रामपंचायतींचे सरपंच आणि सदस्यांचा सहभाग घेण्यात येणार आहे. यावर्षी १ ते ७ जुलै या कालावधीत राज्यात कृषी सप्ताह साजरा करण्यास शासनाच्या कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाच्या निर्णयान्वये १८ जून रोजी मान्यता देण्यात आली आहे. या सप्ताहात राज्यातील गावागावात कृषीविषयक केंद्र व राज्य शासन पुरस्कृत विविध कृषी योजनांची माहिती शेतकर्‍यांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. तसेच राज्यातील कृषी विद्यापीठे, केंद्रीय संशोधन संस्थांनी संशोधित केलेले अद्ययावत तंत्रज्ञान शेतकर्‍यांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. हा कार्यक्रमात प्रत्येक गावात राबविण्याकरिता तालुका व जिल्हास्तरावर नियोजन करण्यात आले आहे. कृषी जागृती सप्ताहात गावपातळीवर गावागावातील शेतकरी, शेतकरी मित्र, शेतकरी बचत गटांचे प्रतिनिधी, शेतकरी उत्पादक कंपन्या आणि ग्रामपंचायतींचे सरपंच व सदस्यांचा सहभाग घेण्यात येणार आहे. या कृषी सप्ताहात कृषी विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी गावागावात शेतकर्‍यांच्या बैठका घेऊन कृषी विभागाच्या योजना आणि अद्ययावत कृषी तंत्रज्ञानाची माहिती शेतकर्‍यांना देणार आहेत.

*अंमलबजावणीत या विभागांचा राहणार सक्रिय सहभाग!

          कृषी जागृती सप्ताहाच्या अंमलबजावणीत कृषी विद्यापीठे, संशोधन केंद्रे, कृषी विज्ञान केंद्रे, कृषी महाविद्यालये, कृषी तंत्रनिकेतन, साखर कारखाने, कृषी उत्पन्न बाजार समित्या, महाबीज, महाराष्ट्र राज्य कृषी उद्योग विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ, कृषी पणन मंडळ, राष्ट्रीयीकृत आणि सहकारी बँका आणि कृषी संलग्न सर्व विभागांचा सक्रिय सहभाग घेण्यात येणार आहे.