शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

अपघाती मृत्यू रोखण्यासाठी करार

By admin | Updated: February 24, 2016 01:44 IST

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील अपघाती मृत्यू रोखण्यासाठी राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) वाहन उत्पादक कंपनी महिंद्रा आणि सेव्ह लाइफ फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेसोबत

मुंबई : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील अपघाती मृत्यू रोखण्यासाठी राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) वाहन उत्पादक कंपनी महिंद्रा आणि सेव्ह लाइफ फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेसोबत मंगळवारी एका सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या. येत्या पाच वर्षांत महामार्गावरील अपघाती मृत्यूंची संख्या शून्यावर आणण्यासाठी संबंधित सर्व यंत्रणांचा समन्वय, संशोधन आणि तंत्रज्ञानाच्या वापरावर भर देण्यात येणार आहे. मुंबई-पुणे महामार्गावरील अपघातांची वाढणारी संख्या सरकारसाठी चिंतेचा विषय आहे. महामार्गावरील अपघात टाळण्यासाठी मोठ्या प्रमाणावर उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. दरडी कोसळून अपघात होऊ नयेत, यासाठी संरक्षक जाळी लावण्याचे काम वेगाने सुरू आहे. त्याचप्रमाणे, अपघातात वाहने उलटून प्राणहानी होऊ नये, यासाठी ब्रिफेन वायर रोप्स लावण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. सीसीटीव्ही कॅमेरेही बसवण्यात येणार आहेत. महामार्गावरील अपघाती मृत्यू रोखण्यासाठी एमएसआरडीसी, महिंद्रा अँड महिंद्रा आणि सेव्ह लाइफ फाउंडेशन संयुक्तपणे मोहीम राबविणार आहे. त्यासाठी संशोधन आणि अभियांत्रिकी उपाययोजना, अपघातग्रस्तांना तातडीची मदत, पोलिसांकडून प्रशिक्षण व नियमांची अंमलबजावणी या चार बाबींवर भर देण्यात येणार आहे. त्यासाठी राज्य महामार्ग पोलीस यंत्रणा, आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर्स, डी.वाय. पाटील विद्यापीठ, ओगील्वी, जे.पी. रिसर्च आणि एक्स्प्रेस वेजवळील अनेक रुग्णालयांना मोहिमेशी जोडण्यात येणार आहे. दोन वर्षांपासून मोहिमेची तयारी सुरू असून, मुंबई-पुणे महामार्गाच्या प्रत्येक किलोमीटरचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. प्रत्येक टप्प्यावरील रस्त्याची स्थिती, वाहनचालकांना येणाऱ्या संभाव्य अडचणी, तांत्रिक चुकांचा अभ्यास करण्यात आल्याची माहिती राज्याचे माजी मुख्य सचिव आणि सेव्ह लाइफ फाउंडेशनचे प्रमुख मार्गदर्शक जयंत बांठिया यांनी सांगितले. तर देशातील रस्ते सुरक्षित बनविण्यावर महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्राचा भर आहे. चांगली वाहने, तंत्रशुद्ध रस्ते, योग्य वाहतूक नियमन, वाहनचालकांचे प्रशिक्षण, नियमांची प्रभावी अंमलबजावणीची आवश्यकता आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर जनजागृतीची आवश्यकता असल्याचे महिंद्राचे वरिष्ठ उपाध्यक्ष विजय नाक्रा यांनी सांगितले. (प्रतिनिधी)अपघात रोखण्यासाठी महत्त्वाचे पाऊलसेव्ह लाइफ फाउंडेशन आणि महिंद्रा अँड महिंद्रा यांच्यासह होत असलेल्या सामंजस्य करारामुळे, द्रुतगती महामार्गावरील अपघाती मृत्यू शून्यावर आणण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आल्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री (सार्वजनिक उपक्रम) एकनाथ शिंदे यांनी सांगितले.