शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

स्मार्ट सिटी योजनेसाठी कोरियन कंपनीशी करार

By admin | Updated: April 7, 2017 03:30 IST

कल्याण-डोंबिवली स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी महापालिकेने कोरिया लॅण्ड हाऊसिंग कॉर्पोरेशन या सरकारी कंपनीशी गुरुवारी सामंजस्य करार केला

कल्याण : कल्याण-डोंबिवली स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी महापालिकेने कोरिया लॅण्ड हाऊसिंग कॉर्पोरेशन या सरकारी कंपनीशी गुरुवारी सामंजस्य करार केला. ही कंपनी महापालिकेस स्मार्ट सिटी प्रकल्पाकरिता तांत्रिक व आर्थिक सहाय्य पुरवणार आहे. कोरिया सरकार चार हजार कोटी रुपये अर्थसहाय्य देणार आहे. यामुळे प्रकल्प अधिक गतीमान होईल, असा दावा करण्यात आला. यावेळी कंपनीचे पदाधिकारी कॅन कून फाँग, हु से चँग, पार्थ ज्यून सिमो, सॉन्ग जी सॉन्ग यांच्यासह महापौर राजेंद्र देवळेकर, आयुक्त ई. रवींद्रन, स्थायी समिती सभापती रमेश म्हात्रे, शिक्षण सभापती वैजयंती घोलप, सभागृह नेते राजेश मोरे, विरोधी पक्ष नेते प्रकाश भोईर, काँग्रेस गटनेते नंदू म्हात्रे, शिवसेना गटनेते रमेश जाधव, भाजप गटनेते वरुण पाटील यांच्यासह शहर अभियंते प्रमोद कुलकर्णी व कोरियन कंपनीचे सल्लागार विवेक विचारे आदी मान्यवर उपस्थित होते. केंद्र व राज्य सरकारने कोरियन कंपनीशी केलेल्या करारानुसार महाराष्ट्रातील पुणे, नागपूर आणि कल्याण-डोंबिवली शहरांचा विकास ही कंपनी करणार आहे. या शहरांत विकासाला वाव असल्याने त्यांची निवड केल्याचे कंपनीने स्पष्ट केले. एरिया बेस व पॅन सिटी या दोन मार्गाने शहरांचा विकास केला जाणार आहे. एकूण २८ प्रकल्पांचे सविस्तर प्रकल्प अहवाल तयार केले जाणार आहेत. दरवर्षी २०० कोटी रुपये खर्चाची विकास कामे अपेक्षित असून त्यासाठी महापालिका दरवर्षी अर्थसंकल्पात ५० कोटींची तरतूद करणार आहे. कोरियन कंपनी प्रकल्पांचे मास्टर प्लॅन तयार करणार आहे. चार हजार कोटी रुपयांचे अर्थसहाय्य कंपनी कमी व्याजदराने उपलब्ध करील व त्याची परतफेड कशी करायची याचे मार्गदर्शन सरकार करील, असे आयुक्त रवींद्रन यांनी स्पष्ट केले. महापौर देवळेकर म्हणाले की, या करारामुळे शहरे स्मार्ट करण्याच्या प्रकल्पाला आर्थिक पाठबळ मिळणार आहे. येत्या पाच वर्षांत प्रकल्प पूर्ण करण्याच्या दिशेने पडलेले हे पहिले पाऊल आहे. कंपनीचे सल्लागार विवेक विचारे यांनी सांगितले की, करार करण्यात आलेली कंपनी ही सरकारी असून तिची स्थापना १९५२ मध्ये झाली. या कंपनीने कोरियातील ५० शहरे स्मार्ट केली आहेत. कंपनीकडे जवळपास ९ हजारांचे मनुष्यबळ आहे. (प्रतिनिधी)>व्हिडीओ चित्रफितीत मांडला आराखडाकंपनीने सादर केलेल्या व्हिडीओ चित्रफितीमध्ये स्मार्ट सिटीचा विकास कसा केला जाणार, याचा आराखडा दाखवण्यात आला. खाडी किनारा सुशोभिकरण, रेल्वे परिसर वाहतूककोंडी मुक्त करणे, वाहतुकीचे नियोजन, रस्ते विकास यावर भर देण्यात आला आहे. आयटी कंपन्या, ग्रीन लॅण्डचा विकास करुन त्याद्वारे शहरात नोकऱ्या उपलब्ध होतील. कल्याण-डोंबिवली शहरे २०१७ ते २०२३ या कालावधीत स्मार्ट करण्याचे लक्ष्य आहे. त्यासाठी २ हजार कोटींचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे.