मुंबई : अनुसूचित जमातीतील समावेशाच्या मुद्दय़ावरून राज्यभर पेटलेले आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा धनगर आरक्षण कृती समितीने दिला आहे. धनगर समाजाच्या वतीने 1 ऑगस्ट रोजी मुंबईत सांस्कृतिक आंदोलन छेडण्यात येणार असल्याचे समितीचे समन्वयक नवनाथ पडळकर यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले.
दादरच्या छबिलदास शाळेत आज धनगर समाजाचा निर्धार मेळावा घेण्यात आला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना पडळकर म्हणाले की, अनुसूचित जातींच्या यादीत उल्लेख करण्यात आलेला धनगड म्हणजेच धनगर समाज. राज्यात धनगड नावाची जमातच अस्तित्वात नाही. केवळ भाषांतरात गल्लत केल्याने गेल्या 63 वर्षापासून धनगर समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवण्यात येत आहे.
राज्य सरकारने तात्काळ धनगर म्हणजे धनगड हे मान्य करून आरक्षण लागू करावे. अनुसूचित जमातींत तिस:या सूचीत धनगर समाजाचा समावेश करण्याचा पर्याय वेळखाऊ आणि दिशाभूल करणारा असल्याने समितीने हा पर्याय फेटाळला आहे, असे पडळकर म्हणाले.
आरक्षणाचे आंदोलन सर्वपक्षीय बनले आहे. विविध पक्ष, संघटनांचे नेते, कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले आहेत.
केवळ आरक्षणाच्या मुद्यावरच धनगर समाज विधानसभा निवडणुकीत उतरणार आहे. त्यामुळे आचारसंहिता लागू होण्याआधी राज्य सरकारने आरक्षणाचा मार्ग मोकळा करावा, अशी मागणी समितीने केली. (प्रतिनिधी)
पिचडांविरुद्ध याचिका
आदिवासी विकासमंत्री मधुकर पिचड यांच्याविरोधात न्यायालयात याचिका दाखल करण्यात येईल. आदिवासी नसतानाही खोटी प्रमाणपत्रे मिळवून आरक्षणा लाभ उठविला जात आहे. समितीकडे तसे पुरावे असून न्यायालयासमोर ते सादर करण्यात येतील, असे पडळकर म्हणाले.
मान्यता मिळवून
देऊ - फडणवीस
च्धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गाची अंमलबजावणी करण्यास राज्य शासनाने
शिफारस केली, तर केंद्राची मान्यता मिळवून देण्याचे काम महायुती करेल, असे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
च्राष्ट्रीय समाजपक्षाचे नेते महादेव जानकर यांनी नामोल्लेख न करता ‘धनगर समाजाच्या आरक्षणाचे मारेकरी बारामतीचेच नेते आहेत’ असा आरोप केला. ते म्हणाले, येथील नेत्याने समाजातील मंडळींना दुय्यम दर्जाची पदे देऊन मुख्य प्रवाहापासून दूूर ठेवले.
वडार समाज राज्यव्यापी आंदोलन करणार
नवी मुंबई : राज्यातील धनगर समाजापाठोपाठ वडार समाजानेही आदिवासींमध्ये समावेश करण्याची मागणी केली आहे. यासाठी राज्यव्यापी आंदोलन उभारण्यात येणार आहे.
12 ऑगस्टला पुणो जिल्हा अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून आंदोलनाची सुरुवात केली जाणार आहे. वडार समाज संघर्ष समितीने आज ऐरोलीमध्ये विशेष बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीस विविध पक्षातील समाजाचे पदाधिकारी सहभागी झाले होते.
हक्कासाठी जसास तसे उत्तर देऊ
अकोले (जि. अहमदनगर) : आता कुठं आदिवासींची पोरं शिकून शहाणी होऊ लागली आहेत. लगेच आमचं आरक्षण हिसकावून घेण्याचा प्रयत्न करू नका. आरक्षणापुढे
मंत्रिपद महत्त्वाचं नाही, वेळ पडल्यास त्याचा त्याग करू, पण आदिवासींच्या हक्कासाठी जशास तसे उत्तर
देऊ, असा इशारा आदिवासी विकासमंत्री मधुकर पिचड यांनी दिला आहे.
आदिवासी विरुद्ध धनगर असा संघर्ष सध्या राज्यात पेटला असून, मंगळवारी येथे आदिवासींनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. मधुकर पिचड व वैभव पिचड यांच्या नेतृत्वाखाली शहरातून संघर्ष रॅली काढण्यात आली. सुमारे 1क् हजार आदिवासी मोर्चात सहभागी झाले होते. कोणताही समाज किंवा व्यक्तीविरुद्ध आमचा लढा नाही, आरक्षणात घुसखोरी करणा:या प्रवृत्तींविरोधात हा लढा आहे. आता अन्याय सहन केला जाणार नाही. आदिवासी युवक अन्यायाविरुद्ध पेटून उठल्यावर विझत नाही, हे लक्षात ठेवा, असे पिचड म्हणाले.
माजी आदिवासीमंत्री धनगर समाजाला पाठिंबा देण्यासाठी सरसावले आहेत. त्यांना खरा आदिवासी कळला नाही. आदिवासींच्या योजना लुटण्यापलीकडे त्यांनी काही केले नाही, असा आरोप बबनराव पाचपुते यांचे नाव न घेता पिचड यांनी केला. (प्रतिनिधी)
नंदुरबारमध्ये आज
जिल्हा बंदची हाक
नंदुरबार : आदिवासी महासंघार्फे 3क् जुलैला जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवांना त्यातून वगळण्यात आले असून जनतेने स्वयंस्फूर्तीने बंदमध्ये सहभागी व्हावे, असे महासंघातर्फे सांगण्यात आले. धनगर समाजाला आदिवासी प्रवर्गात समाविष्ठ करण्यास विरोध करणो आणि आमदार शरद गावीत यांनी वापरलेल्या अपशब्दाचा निषेध करण्यासाठी बंद आयोजित करण्यात आल्याचे महासंघाचे अध्यक्ष डॉ. भरत वळवी यांनी सांगितले.
आता पूर्ण आरक्षणासाठी लढा - मेटे
नंदुरबार : राज्यातील मराठा समाजाला मिळालेले आरक्षण अर्धवट असून ते पूर्णपणो मिळविण्यासाठी यापुढे आपल्याला लढायचे आहे. ही लढाई जिंकण्यासाठी समाजाने आजर्पयत ज्या पद्धतीने सहकार्य केले तसेच सहकार्य यापुढेही करावे, असे आवाहन शिवसंग्राम संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांनी मंगळवारी येथे केले.