शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

वृद्ध शेतकरी दांम्पत्य जुंपले नांगरला

By admin | Updated: July 22, 2016 19:37 IST

ट्रॅक्टर किंवा बैलाच्या साह्याने शेत नांगरणी करणेही परवडत नसल्याने एक वृद्ध दांम्पत्य चक्क नांगरला जुंपले आहेत. शेतीसाठी बैलच नसल्याने आणि ट्रॅक्टरच्या साह्याने शेती करणेही

- संदीप भालेराव,

नाशिक, दि. 22 -  ट्रॅक्टर किंवा बैलाच्या साह्याने शेत नांगरणी करणेही परवडत नसल्याने एक वृद्ध दांम्पत्य चक्क नांगरला जुंपले आहेत. शेतीसाठी बैलच नसल्याने आणि ट्रॅक्टरच्या साह्याने शेती करणेही आर्थिकदृट्या परवडत नसल्यामुळे हे दांम्पत शेतात राबत आहे. साधारणपणे साठीच्या पुढे वयोमान असलेले हे दांम्पत्य बैलाच्या जागी जुंपून नांगर ओढत आहे. नाशिकपासून अवघ्या आठ किलोमीटर अंतरावरील शिवनई गावच्या शिवारात हे अल्पभुधारक शेतकरी शेतात राबत आहे. आधुनिक पद्धतीच्या शेतीने शेतकऱ्यांचे जीवनमान उंचवल्याची आकडेवारी शासकीय पातळीवर दिली जात असली तरी अल्पभुधारक शेतकऱ्यांना मात्र अजूनही पारंपरिक पद्धतीनेच शेती करावी लागत असल्याचे हे वास्तव आहे. शेतीची कामे आता आधुनिक पद्धतीने होऊ लागली आहेत. त्यामुळे बैलांचा वापर कमी झाला आहेच शिवाय दुष्काळी परिस्थितीमुळे बैलांचा सांभाळ करणेही कठिण झाल्यामुळे बैलांची संख्या कमी झाली आहे. या शेतकऱ्यांकडे बैल नसल्यामुळे आणि दुसऱ्याचे बैल किंवा ट्रॅक्टर भाड्याने आणणेही परवडत नसल्यामुळे हे दांम्पत्य स्वता:च नांगर ओढत आहे. भुईमुगाचे पीक घेण्यासाठी आजोबा नांगर ओढतात तर त्यांच्या पत्नी या पाठीमागून नांगर घेऊन चालतात. पावसाच्या रिमझिम सरीत आणि मजलदर मजल करीत या दांम्पत्याने अर्धेहून अधिक शेत नांगरले आहे. भुईमुगाची लागवड करण्यासाठी भल्या पहाटे हे दांम्पत्य शेतावर येतात आणि दिवसभर नांगरला जूपून शेत नांगरणी करतात. शहराच्या अगदी जवळ शेती असूनही शेतीसाठी कुणाचीही मदत मिळत नसल्यामुळे पारंपरिक पद्धतीने हे दांम्पत्य शेती कामात गुंतल्याचे दिसते.