शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

अगरवाल यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला

By admin | Updated: April 29, 2016 00:59 IST

मेपलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सचिन अगरवाल यांचा अटकपूर्व जामीन अर्ज अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. बी. कचरे यांनी गुरुवारी फेटाळला.

पुणे : पाच लाख रुपयांत घरप्रकरणी मेपलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सचिन अगरवाल यांचा अटकपूर्व जामीन अर्ज अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. बी. कचरे यांनी गुरुवारी फेटाळला. दरम्यान, पीएमआरडीए आणि आणखी संबंधित विभागाकडे चौकशी केल्यानंतर अगरवाल यांच्याविरुद्धच्या गुन्ह्यात भारतीय दंड संहिता ४६८, ४६९, ४७०, ४७१ आणि ४०९ ही कलमे वाढविण्यात आली आहेत. सचिन अगरवाल यांच्यासह नवीन अशोक अगरवाल, सेल्स मॅनेजर प्रियंका अगरवाल यांच्यावर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ग्रुपच्या संचालक आणि अधिकाऱ्यांनी संगनमत करुन सामान्य जनतेची दिशाभूल केली. नोंदणीसाठी नागरिकांकडून पैसे गोळा केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात अटक टाळण्यासाठी सचिन अगरवाल यांनी न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. या अर्जावर गुरुवारी सुनावणी झाली. जिल्हा सरकारी वकील उज्ज्वला पवार यांनी अगरवाल यांच्या जामिनास जोरदार विरोध केला. हा सर्वांत मोठा घरकुल घोटाळा आहे. अगरवाल यांनी प्रधानमंत्री आवास योजनेचा लोगो वापरण्याबरोबरच गैरवापर केला आहे. योजनेसाठी सरकारची प्रधानमंत्री, मुख्यमंत्री, पालकमंत्री तसेच म्हाडाची कोणत्याही प्रकारची परवानगी घेण्यात आली नाही. तसेच, प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेत पैसे गुंतवा, अशी कोणतीही तरतूद नसल्याने आरोपींनी अनेकांना फसविले आहे. त्यामुळे अगरवाल यांचा जामीन अर्ज फेटाळावा, अशी मागणी पवार यांनी केली. योजनेच्या माध्यमातून नागरिकांकडून घेण्यात आलेले पैसै परत करण्यात येत आहे. आत्तापर्यंत १३ हजार नागरिकांचे पैसे परत करण्यात आल्याने, अटकपूर्व जामीन मंजूर करावा, अशी मागणी बचाव पक्षातर्फे न्यायालयात करण्यात आली. दोन्ही बाजूच्या युक्तिवादानंतर मंचाने अगरवाल यांचा जामीन अर्ज फेटाळला.(प्रतिनिधी)