शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

अग्रवाल, दीपचंद यांना अटक होणार?

By admin | Updated: April 16, 2017 02:14 IST

आर्टिलरी सेंटरमधील लष्करी जवान डीएस रॉय मॅथ्यू यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी, देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असलेली ‘द क्विंट’ या वेबसाइटची

नाशिक : आर्टिलरी सेंटरमधील लष्करी जवान डीएस रॉय मॅथ्यू यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी, देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असलेली ‘द क्विंट’ या वेबसाइटची पत्रकार संशयित पूनम अग्रवाल (रा़ नवी दिल्ली) व सेवानिवृत्त लष्करी अधिकारी दीपचंद कश्मिरसिंग कयात यांचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायाधीश एम़ एस़ पठाण यांनी शनिवारी फेटाळला़ त्यामुळे दोघांच्या अटकेचा मार्ग मोकळा झाला आहे.सरकारी वकील पंकज चंद्रकोर यांनी न्यायालयात जामिनास तीव्र विरोध केला़ पत्रकार अग्रवाल व लष्करी अधिकारी दीपचंद यांनी फेब्रुवारीमध्ये ‘बडीज ड्युटी’च्या नावाखाली केलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये लष्करी जवान मॅथ्यू यांनी लष्करी अधिकाऱ्यांकडून जवानांच्या पिळवणुकीबाबत तक्रार केली होती़ या दोघांनी या स्टिंगसाठी बेकायदेशीररीत्या लष्करी हद्दीत प्रवेश करून, जवानांचे फोटो व व्हिडीओ क्लिप काढून ती सोशल मीडियावर व्हायरल केली़ या क्लिपमध्ये वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांच्या मदतीला दिल्या जाणाऱ्या सहायक कर्मचाऱ्यांना, संबंधित अधिकाऱ्यांच्या कुटुंबीयांच्या घरातील मुलांची शाळेत ने-आण करणे, कुत्र्याला फिरवून आणणे, कपडे धुणे अशी कामे करावी लागत असल्याचे चित्रफितीतून समोर आले होते.सोशल मीडियावर हे स्टिंग व्हायरल झाल्यानंतर आपले कोर्ट मार्शल होईल, अशी भीती लान्सनायक तथा सहायक पदावर कार्यरत असलेले डीएस रॉय मॅथ्यू यांनी त्या व्हिडीओत व्यक्त केली होती. त्यानंतर, २४ फेब्रुवारीपासून ते बेपत्ता होते. २ मार्च २०१७ रोजी मॅथ्यू यांचा गळफास घेतलेला मृतदेह कुजलेल्या अवस्थेत बराकीमध्ये आढळून आला़ मॅथ्यू यांनी स्टिंग आॅपरेशनमुळे आत्महत्या केल्याचे पोलीस तपासात समोर आले़ (प्रतिनिधी)बड्या वकिलांची हजेरीपत्रकार अग्रवाल व दीपचंद यांच्या अटकपूर्व जामिनावर शनिवारी युक्तिवाद झाला़ त्यांच्या युक्तिवादासाठी सर्वोच्च व उच्च न्यायालयातील चार ते पाच ज्येष्ठ वकील जिल्हा न्यायालयात आले होते़ मात्र, सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरत, न्यायाधीश पठाण यांनी जामीन फेटाळला़