शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

गोव्याच्या खाण उद्योगासमोर पुन्हा अडथळे

By admin | Updated: December 21, 2015 02:19 IST

साडेतीन वर्षांपूर्वी बंद पडलेला गोव्याचा खाण उद्योग पुन्हा उभा राहण्याच्या तयारीत असताना, त्याच्या मार्गात पुन्हा मोठे अडथळे आले आहेत.

सद्गुरू पाटील, पणजीसाडेतीन वर्षांपूर्वी बंद पडलेला गोव्याचा खाण उद्योग पुन्हा उभा राहण्याच्या तयारीत असताना, त्याच्या मार्गात पुन्हा मोठे अडथळे आले आहेत. गोव्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेला, पण पर्यावरणाची आतापर्यंत अपरिमित हानी केलेला हा उद्योग नव्याने उभा राहणे कठीण बनू लागल्याने, खनिज व्यावसायिकांमध्ये चिंता आहे. सरकारही हवालदिल झाले आहेत.पर्यटन व खनिज हे गोव्याचे दोन महत्त्वाचे उद्योग. खनिज व्यवसायातून गोवा सरकारला वार्षिक सुमारे एक हजार कोटींचा महसूल मिळतो, तर त्यापेक्षा जास्त रॉयल्टी केंद्र सरकारला मिळते. आॅक्टोबर २०१२ मध्ये खाण उद्योग बंद झाला. तत्पूर्वी गोव्याच्या खाण व्यवसाय क्षेत्रात ३५ हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा अहवाल न्या. एम. बी. शहा आयोगाने दिला होता. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने गोव्याचा खाण उद्योग नव्याने सुरू करताना, काही नियम व अटींचे काटेकोर पालन करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली आणि काही मार्गदर्शक तत्त्वेही ठरवून दिली.साडेतीन वर्षांनंतर आता गोवा सरकारने ८८ खाणपट्ट्यांचे कंपन्यांना वाटप केले. मात्र, खाण उद्योग सुरू होण्याची चिन्हे दिसत नाहीत. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खनिजाचा दर खूप उतरला आहे. त्यामुळे खनिजाला मागणी घटली आहे. दुसरीकडे खनिज वाहतुकीचे मुख्य साधन असलेल्या गोव्यातील शेकडो ट्रक मालकांनी संप पुकारला आहे. खनिज वाहतुकीसाठीचा दर वाढवून द्यावा, अशी संघटनेची मागणी आहे. गोव्याचा खाण उद्योग नव्याने सुरू होण्याच्या मार्गात अडथळे येत आहेत. सरकारला त्याची कल्पना आहे. अडथळे दूर करण्यासाठी सरकारने गंभीरपणे प्रयत्न सुरू केले आहेत. अकारण संप करणाऱ्या ट्रक मालकांनी सरकारला सहकार्य करावे, असे आवाहन सातत्याने करत आहे. - लक्ष्मीकांत पार्सेकर,मुख्यमंत्री, गोवाखाण उद्योगाच्या सध्याच्या स्थितीला सरकारच जबाबदार आहे. सरकारने ट्रक मालकांचा वाद सोडविण्यासाठी पूर्वी पावले उचलायला हवी होती. - जुझे फिलिप डिसोझा, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेसआठ रुपये प्रति टन दराने खनिज वाहतूक करण्यास आम्ही तयार आहोत, असे सहाशे ट्रक मालकांनी यापूर्वी कंपनीला सांगितले होते. तसा करारही झाला होता. आता काही ट्रक मालक अडचणी निर्माण करत आहेत. मालाची निर्यात झाली नाही, तर आमचा प्रकल्प बंद पडेल.- ए. जोशी, उपाध्यक्ष,कॉर्र्पोरेट अफेअर्स, सेसा गोवा