शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

पुन्हा संततधार

By admin | Updated: September 19, 2016 05:34 IST

मध्य भारतासह अरबी समुद्रातील वातावरणीय बदलामुळे मुंबई आणि राज्यातील पावसाचा जोर वाढतच आहे.

मुंबई : मध्य भारतासह अरबी समुद्रातील वातावरणीय बदलामुळे मुंबई आणि राज्यातील पावसाचा जोर वाढतच आहे. गुरुवारपासून राज्यासह मुंबईत सुरू झालेल्या पावसाने उत्तरोत्तर चांगलाच जोर पकडला आहे. शुक्रवारसह शनिवारी आणि रविवारीही पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. रविवारी सकाळपासून सायंकाळापर्यंत कोसळलेल्या पावसाने मुंबापुरीला चांगलेच झोडपून काढले. परिणामी, मुंबईकरांचा रविवार पाण्यात गेला असून, सोमवारीही पावसाचा जोर कायम राहील, असा इशारा मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने दिल्याने मुंबईकरांची पावसाळी कसरत सुरूच राहणार आहे.मुंबई प्रादेशिक हवामान खात्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, शहरात ३४.३५ मिलीमीटर, पूर्व उपनगरात ४१.१० मिलीमीटर आणि पश्चिम उपनगरात ४९.६८ मिलीमीटर पाऊस पडला. विशेषत: नरिमन पॉइंट, मरिन ड्राइव्ह, गिरगाव, महालक्ष्मी, वरळी, प्रभादेवी, माहीम, लोअर परेल, दादर, वांद्रे-कुर्ला संकुल, कुर्ला, घाटकोपर, पवई, भांडुप, मुलुंड, अंधेरी आणि गोरेगाव या परिसरात रविवारी सकाळपासून मुसळधार पावसाच्या सरी बरसल्या. पावसाचा जोर कायम राहिल्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, लाल बहादूर शास्त्री मार्ग, सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोड, अंधेरी-कुर्ला रोड, घाटकोपर येथील असल्फा रोड आणि कुर्ला-सांताक्रुझ रोडवरील वाहतुकीचा वेग मंदावला होता. तर महापालिका नियंत्रण कक्षाच्या माहितीनुसार, पश्चिम उपनगरात एके ठिकाणी घराच्या भिंतीचा भाग पडला. शहरात ८, पश्चिम उपनगरात २ अशा एकूण १० ठिकाणी शॉर्टसर्किटच्या घटना घडल्या. शहरात ११, पूर्व उपनगरात २ आणि पश्चिम उपनगरात ९ अशा एकूण २२ ठिकाणी झाडे कोसळली. सुदैवाने या दुर्घटनांमध्ये जीवितहानी झाली नाही. (प्रतिनिधी)>मच्छीमारांना इशाराअरबी समुद्रातील वातावरणामुळे कोकणच्या किनाऱ्यावर वेगाने वारे वाहत असून, जोरदार पावसाचा मारा सुरू आहे. वाहणाऱ्या वाऱ्याचा वेग ताशी ५५ किलोमीटर असून, समुद्र खवळलेला आहे. परिणामी, मच्छीमारांनी मासेमारीसाठी समुद्रात उतरू नये.>मुंबईला इशारासोमवारी मुंबई शहर आणि उपनगरात ठिकठिकाणी मुसळधार पावसाच्या सरी कोसळतील.>राज्याला इशारा१९, २०, २१ आणि २२ सप्टेंबर रोजी कोकण आणि गोव्यात मुसळधार पाऊस पडेल.१९, २०, २१ आणि २२ सप्टेंबर रोजी उत्तर कोकणात मुसळधार पाऊस पडेल.२१ आणि २२ सप्टेंबर रोजी उत्तर मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडेल.२२ सप्टेंबर रोजी मराठवाड्यात मुसळधार पाऊस पडेल.२२ सप्टेंबर रोजी दक्षिण मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडेल.