शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

मतदान करून ते चढले बोहल्यावर

By admin | Updated: February 16, 2017 18:18 IST

मतदानाचे महत्व जाणून बुलडाणा जिल्ह्यातील दोन ठिकाणी नवरदेव व नवरीने लग्नाअगोदर मतदानाचा अधिकार बजावत नवा आदर्श समोर ठेवला आहे.

ऑनलाइन लोकमत
बुलडाणा, दि. 16 - मतदानाचे महत्व जाणून बुलडाणा जिल्ह्यातील दोन ठिकाणी नवरदेव व नवरीने लग्नाअगोदर मतदानाचा अधिकार बजावत नवा आदर्श समोर ठेवला.  या नवरदेव आणि नवरीने  सुरूवातील मतदान केले व त्यानंतर बोहल्यावर चढले. मतदान करणे हा प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे. परंतू सद्यपस्थितीत अनेकजण मतदानासाठी मिळणाºया सुट्टीचाही दुरुपयोग करतात. मतदानाला मिळालेल्या सुट्टीला मतदान न करता बाहेरगावी फिरण्यात या सुट्टीचा आनंद घेताता. परिणामी मतदानाचा टक्का दिवसेंदिवस घटत चालला आहे. परंतू बुलडाणा जिल्ह्यातील नवरदेव नवरीने सुरूवातीला मतदानाचा हक्क बजावून त्यानंतर शुभमंगल केल्याचा प्रकार जि.प.व पं.स निवडणूकीच्या मतदान केंद्रावर समोर आला आहे. मोताळा तालुक्यातील धामणगाव बढे-लिहा सर्कलमधील ऊऱ्हा येथील सचिनसिंग राजपूर या युवकाने १६ फेब्रुवारीरोजी सकाळी सुरूवातीला मतदान
केले व त्यानंतर लग्नाच्या बोहल्यावर चढला. लग्नापेक्षाही मतदानाच्या अधिकाराला अधिक महत्व देणाऱ्या उऱ्हा येथील या युवकाचे आदर्श मतदान ठरले. त्यानंतर असाच प्रकार लोणार तालुक्यातील नांद्रा येथे घडला. आश्रुबा माणिकराव मुंढे यांची सुकन्या चि.सौ.कां. अनिता या नववधुने लग्णाच्या दिवशी सुरूवातीला मतदानाचा हक्क बजावला व त्यानंतर लग्न मंडपात गेली. बुलडाणा जिल्ह्यात दोन ठिकाणी घडलेल्या या आदर्श मतदानाने मतदानाचे महत्व पटवून दिले आहे. दोन्ही ठिकाणच्या या नवरदेव नवरीने लग्नापेक्षा मतदानाला महत्त्व दिल्याने त्यांच्या मतदानाची सर्वत्र चर्चा होत आहे.
 
अनिताने लग्नाच्या दिवशी मतदानाला दिले महत्त्व
  लोणार तालुक्यातील नांद्रा येथील आश्रुबा माणिकराव मुंढे यांची सुकन्या चि.सौ.कां. अनिता या नववधुने वराला वरमाला घालण्याअगोदर मतदानाचा अधिकार बजावला व मतदानाचे महत्व पटवून दिले. येथील आश्रुबा मुंढे यांची सुकन्या चि.सौ.कां.अनिता हिचा विवाह वाकद ता. रिसोड येथील कैलास निवृत्ती डोंगरे यांच्याशी १६ फेब्रुवारी रोजी लोणी सखाराम महाराज येथे पार पडला. यावेळी वधूने सकाळी मतदान केंद्रावर जाऊन प्रथम आपला मतदानाचा हक्क बजावला. उच्चशिक्षीत असलेल्या अनिताने लग्नाच्या घाईगर्दीत मतदान करण्याचा निर्णय सर्वांना नवल वाटणारा ठरला. तसेच लग्न सोहळा सुद्धा सर्व वायफळ खर्चांना फाटा देऊन अगदी साध्या पद्धतीने करण्याचा निर्णय केला व अंमलात आणला. यामुळे या आदर्श वधुचा हा लग्नसोहळा एक आदर्शच ठरला. (वार्ताहर )