शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

अखेर दोन वर्षांनी मायलेकीची भेट, कफ परेड पोलिसांची कामगिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2018 04:49 IST

उत्तर प्रदेशमधील तरुणी दोन वर्षांपूर्वी घरातून गायब झाली होती. मानसिक रुग्ण असलेली ही तरुणी मुंबईत भटकत होती. भिकारी समजून एका महिलेने तिला कफ परेड पोलिसांच्या ताब्यात दिले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रश्मी जाधव यांनी तिची विचारपूस करत महिला दिनीच तिची आईसोबत भेट घडवून आणली.

मुंबई - उत्तर प्रदेशमधील तरुणी दोन वर्षांपूर्वी घरातून गायब झाली होती. मानसिक रुग्ण असलेली ही तरुणी मुंबईत भटकत होती. भिकारी समजून एका महिलेने तिला कफ परेड पोलिसांच्या ताब्यात दिले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रश्मी जाधव यांनी तिची विचारपूस करत महिला दिनीच तिची आईसोबत भेट घडवून आणली.मूळची उत्तर प्रदेशातील कैसरगुंज गावात राहणारी भोईरा (२५) मानसिक रुग्ण आहे. त्यामुळे आईवडील सतत तिच्यासोबत असायचे. दोन वर्षांपूर्वी ती गायब झाली. बराच शोध घेऊनही ती सापडली नाही.७ मार्च, २०१८ रोजी मुंबईत एका महिलेला ही तरुणी हात धरून काही तरी सांगण्याचा प्रयत्न करत होती. या महिलेने पोलिसांना असे भिकारी धोकादायक ठरू शकतात, हिच्यावर कारवाई करा, असे सांगितले. पोलीस तिला घेऊन पोलीस ठाण्यात आले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रश्मी जाधव यांनी तिला आईच्या मायेने जवळ घेतले आणि विचारपूस केली. तिला काहीही आठवत नव्हते. अनेक तासांनी तिने भोईरा म्हणून तिचे नाव सांगितले. कैसरगंज हे गावाचे नाव सांगितले. एवढ्याशा माहितीवरून जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने शोध सुरू केला.आई-वडिलांनी गाठली मुंबईमुलगी जिवंत आहे हे समजताच आईवडिलांनी मुंबई गाठली. महिला दिनीच भोईराची आईसोबत भेट झाली. दोघींनाही आनंदाश्रू अनावर झाले. तरुणीला सुखरूप कुटुंबाकडे सोपविल्याची माहिती कफपरेड पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक रश्मी जाधव यांनी दिली.

टॅग्स :MumbaiमुंबईMumbai policeमुंबई पोलीस